शहादा-तळोदा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांनी दत्तक घ्यावा ! - CM Shall take responsiblity of Shahada-Taloda, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

शहादा-तळोदा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांनी दत्तक घ्यावा !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

शहादा-तळोदा तालुक्यातून कोरोनाबाधित रुग्ण जास्त प्रमाणात निघत आहेत. दररोज १५ ते २० जण मृत्युमुखी पडत आहेत. लोकांना वैद्यकीय औषधोपचार, आरोग्यव्यवस्था मिळण्यासाठी मतदारसंघ दत्तक घ्यावा, अशी विनंती आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

शहादा : शहादा-तळोदा तालुक्यातून कोरोनाबाधित रुग्ण जास्त प्रमाणात निघत आहेत. दररोज १५ ते २० जण मृत्युमुखी पडत आहेत. लोकांना वैद्यकीय औषधोपचार, आरोग्यव्यवस्था मिळण्यासाठी मतदारसंघ दत्तक घ्यावा, अशी विनंती आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

आमदार राजेश पाडवी यांनी पत्रात म्‍हटले आहे, की नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहता अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णांपैकी जास्त रुग्ण शहादा-तळोदा तालुक्यातून बाधित आहेत. दररोज शहादा-तळोदा मतदारसंघातून १५ ते २० रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. मतदारसंघातील काही भाग हा अतिदुर्गम व दुर्गम भागामध्ये येतो. 

या मतदारसंघातील काही गावे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व रांगेवरती असल्याकारणाने मुळातच तेथील लोकांना ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. त्यातच त्यांना कोरोनाच्या आजाराने ग्रासल्याने त्यांना सध्या श्वासोच्छ्वासास खूप त्रास होत आहे. लोक जास्त प्रमाणात ऑक्सिजनअभावी दगावत आहेत. रुग्णांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने खासगी रुग्णालयात उपचार करू शकत नाहीत व सिव्हिल रुग्णालयामध्ये गेल्यावर बेड उपलब्ध होत नाहीत, उत्तम प्रकारची औषधे, ऑक्सिजनची व्यवस्था पुरेशी नाही, रेमडेसिव्हिर इंजेक्शन वेळेत उपलब्ध होत नाहीत. सिव्हिल रुग्णालय आणि खासगी रुग्णालय मिळून पण रुग्णांसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे मृत्युदराचे प्रमाण वाढत आहे. शहादा-तळोदा मतदारसंघातील जनतेची वैद्यकीय औषधोपचार करण्याची जबाबदारी आपण घ्यावी व माझ्या मतदारसंघाला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दत्तक घ्यावे, अशी विनंती आमदार पाडवी यांनी केली आहे.  
...

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख