शिवाजी चुंभळे म्हणाले, `पिंगळेच्या जाचाला कंटाळून माझा राजीनामा`

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या जाचाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत, असा आरोप श्री. पिंगळे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी संचालक व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला.
शिवाजी चुंभळे म्हणाले, `पिंगळेच्या जाचाला कंटाळून माझा राजीनामा`

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी मागील पंचवीस वर्षांत बाजार समितीत मोठा घोटाळा केला आहे. त्यांच्या जाचाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत, असा आरोप श्री. पिंगळे यांचे प्रतिस्पर्धी  संचालक व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी पत्रकार परिषेदत केला.

श्री. चुंभळे म्हणाले, मी गेली तीस वर्षे राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. समाजातील अनेकांना मदत केली आहे. राजकीय लाभासाठी मी काहीही केले नाही. मात्र इतरांना लाभ व्हावा म्हणून राजकारणातील पदे घेतली. माझ्या या कामकाजांमुळेच अनेक निवडणूका जिंकल्या. मात्र श्री. पिंगळे यांनी आजवर काय लोकहिताचे काम केले, हे त्यांनी सांगावे. बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी केवळ स्वतःचे हित साधले. बाजार समितीसाठी काहीही केले नाही. बाजार समितीची सव्वाशे एकर जमीन कवडीमोल भावात विकली आहे. कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. त्याविरोधात मी काम केले. त्यामुळे माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र रचून त्रास देण्याचे काम पिंगळे यांनी केले. 

ते पुढे म्हणाले, की नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी व कर्मचार्यांना न्याय देऊ शकत नाही. बाजार समितीचे सभापती असताना अडीच वर्षांच्या कालावधीत तोट्यात असलेल्या बाजार समितीला नफ्यात आणले. कोट्यवधींच्या ठेवी मिळवून देणारा मी पहिला सभापती होतो. सध्याचे विद्यमान संचालक त्यांच्या बहुमताचा फायदा घेऊन मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना माझा विरोध असल्याने सभेत मी एकटा विरोधक आहे. त्यामुळे माझे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते. मला बोलण्याची संधी देत नव्हते. संचालक मंडळ सभेत विरोधी मत प्रदर्शित केल्यास त्याची दखल इतिवृत्तात दखल घेतली जात नव्हती. त्यांच्या बेकादेशीर कामांना तसेच त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्यास पोलिसांत खोटे तक्रारी देऊन माझ्या विरोधात गुन्हे दाखल करत होते. तसेच माझ्यावर दडपण आणत होते. माझा जोडीदार फोडून सत्ता स्थापन केली आहे. ज्यांना सहीचा अधिकार नाही, त्या विद्यमान सभापतींनी २७ लाखांची महागडी कार खरेदी केलीच कशी, असा सवाल श्री. चुंभळे यांनी केला.

दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरु केल्याने महाराष्ट्रातील या आघाडीच्या बाजार समितीचे राजकारण चांगलेच रंगण्याची चिन्हे आहेत.  
..
संबंधित संचालकाने सहकारी संचालकास शिवीगाळ, दमबाजी करत जबर मारहाण केली होती. त्या प्रकरणी बाजार समिती कायदा कलम १७ नुसार संचालक पद रद्द करण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधकांकडे यावर सुनावणी सुरू आहे. सुनावणीत निकाल विरुद्ध लागतो की काय, या भीतीनेच संबंधित संचालकाने राजीनामा दिला असावा.
- देवीदास पिंगळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिकक

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bl7iSKLQpdYAX-i3Ecp&_nc_ht=scontent.fpnq1-1.fna&oh=45285f90c4d41924e3b8d9e0403aabf2&oe=5FB37F27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com