लॉकडाऊनच्या आढाव्यासाठी छगन भुजबळ फिरले गल्ली बोळात - Chhagan bhujbal take review of Lockdown on Ground in City, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

लॉकडाऊनच्या आढाव्यासाठी छगन भुजबळ फिरले गल्ली बोळात

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 मे 2021

शहरात सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरात विविध भागांची पाहणी करत लॉकडाऊनचा आढावा घेतला.

नाशिक :  शहरात सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर (Strict Lockdown Review in the city) राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी नाशिक शहरात विविध भागांची पाहणी करत लॉकडाऊनचा आढावा घेतला.

सायंकाळी पालकमंत्री भुजबळ आपल्या सहकाऱ्यांसह शहराच्या विविध भागात फिरले. मेनरोड, बाजारपेठ, भद्रकाली परिसर, शालीमार, रविवार कारंजी, मालेगाव स्टॅंड, पंचवटी कारंजासह त्यांनी पंचवटीतील विविध भागात प्रत्यक्ष जाऊन लॉकडाऊनची स्थिती पाहिली. यावेळी ठिकठिकाणच्या चेकपोस्टवरील कामकाजाची देखील त्यांनी माहिती घेतली. पोलिसांना त्यांनी विविध सूचना केल्या. लॉकडाऊनचा पर्याय व्यवस्था व नागरिकांना अडचणीचा असल्याने यंदाच्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी. त्यात कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच तो पूर्णपणे नियंत्रणात कसा येईल यावर आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे असे त्यांनी सांगितले.

शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सायंकाळी सहाला शहरात विविध ठिकाणी ही पाहणी केली. या पाहणीला सिडकोतुन सुरवात करण्यात आली. मोरवाडी, उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल, सिव्हिल, सीबीएस, शालिमार, दूध बाजार, मेन रोड, अशोक स्तंभ, पंचवटी, पंचवटी भाजी मार्केट, पेठ रोड, रामवाडी, गंगापूर रोड, कॉलेज रोड मार्गे महात्मा नगर, एबीपी सर्कल, पिटीसी मार्गे पुन्हा मायको सर्कल, चांडक सर्कल, सारडा सर्कल, जुने नाशिक, बागवनपुरा, चौक मंडई, द्वारकामार्गे मुंबई नाका मार्गे नाशिक शहरात पाहणी केली. यावेळी शहरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख