Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हा सर्वोच्च सन्मान

नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य मंडळाने केलेली माझी निवड हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य मंडळाने केलेली माझी निवड हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी आज श्री. भुजबळ यांची भेट घेऊन स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांना विनंतीपत्र देऊन सत्कार केला.  

स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी वास्तव केलेल्या पुण्यभूमीत यंदा मराठी साहित्यिकांचा मेळा भरत आहे. याचा एक नाशिककर म्हणून मला अतिशय आनंद आहे. तसेच या संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड केली आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आपण माझी निवड करण्यात आली हा माझ्यासाठी मी सर्वोच्च असा सन्मान समजतो असे म्हटले आहे.

तसेच नाशिकमध्ये होणारे हे साहित्य संमलेन नक्कीच ऐतिहासिक होईल यात कुठलीच शंका नाही. नाशिककर म्हणून या अगोदरच आपण जबाबदारी स्विकारली आहे. आता स्वागताध्यक्ष म्हणून आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी स्विकारण्यास मी तयार असून नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे, साहित्यिकाचे व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांचे या नाशिक नगरीत स्वागत करण्यास आपण कुठलीही कमतरता राहू देणार नाही. तसेच आपणा सर्वांच्या सोबतीने हे मराठी साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल असा विश्वास व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलतांना माजी आमदार, विश्वस्त हेमंत टकले म्हणाले की, साहित्य क्षेत्राची आवड असलेले आणि समाजसेवी व्रत जोपासणारे व्यक्ती म्हणून नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या स्वागताध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली आहे. आपली झालेली ही निवड आमच्यासाठी अंत्यत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, अॅड. विलास लोणारी, डॉ. कैलास कमोद, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, गिरीश साळवे, मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com