भुजबळ राज्यपालांना म्हणाले, "तब भी हम आपके साथ ही रहेंगे' - Chhagan Bhujbal says, we will be with you | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

भुजबळ राज्यपालांना म्हणाले, "तब भी हम आपके साथ ही रहेंगे'

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांना आणि राज्यपालांनी व्यासपीठावरच प्रश्‍न, प्रतिप्रश्‍न केले. या प्रश्‍नांतून अप्रत्यक्षपणे विद्यापीठाच्या शैक्षणीक वातावरणाला देखील राजकीय किनार चिकटलीच.यात उपस्थितांतील हास्याची खसखस रंग भरुन गेली.

नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या उपस्थितीत आज, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात इमारतीच्या नुतनीकरणाचे उद्‌घाटन झाले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांना आणि राज्यपालांनी व्यासपीठावरच प्रश्‍न, प्रतिप्रश्‍न केले. या प्रश्‍नांतून अप्रत्यक्षपणे विद्यापीठाच्या शैक्षणीक वातावरणाला देखील राजकीय किनार चिकटलीच. यात उपस्थितांतील हास्याची खसखस रंग भरुन गेली.

पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी राज्यपालांना म्हणाले, येत्या दोन वर्षात तुम्ही सर्व इमारती बांधा. याच राज्यपालांच्या उपस्थितीत हे झालं पाहिजे. याचा मतीतार्थ लक्षात आल्यावर राज्यपालांनी भुजबळांना चिमटा घेतलाच. ते म्हणाले, ""तब तक क्‍या सिन रहेगा?''. त्यावर हजर जबाबी भुजबळ उत्तरले, ""हम तब भी आपके साथ ही रहेंगे''. त्यांच्या संवदातील संदर्भ लक्षात आल्यावर सभागृहात मात्र चांगलेच हास्य उसळले.

कार्यक्रमात राज्यपाल आणि भुजबळ यांच्यातील जुगलबंदी हाच चर्चेचा विषय ठरला. यावेळी भुजबळ म्हणाले, राज्यपालांनी वारंवार नाशिकला यावं. नाशिकची हवा आणी निसर्ग अतिशय चांगला आहे. ते त्यांना नक्कीच आवडेल. मला तर वाटते, राज्यपालांनी नाशिकला नवे राजभवन देखील बांधावं. त्यामुळे नाशिकच्या परिसरात एक चांगली वास्तू उभी राहील. भुजबळ म्हणाले, बरं झालं विद्यापीठात सोलर करताय, वीजेच्या ग्रीड फेलमुळे पंधरा दिवसांपूर्वी मुंबई शहर अंधारात गेले होते. अर्थात या सर्वांची सरकार म्हणून आम्ही काळजी घेऊ. सौर प्रकल्पामुळे नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाची नोंद आता जागतिक स्तरावर होईल. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांसह विद्यापीठाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. ...

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख