शेतक-याला धीर देत भुजबळ म्हणाले, `राज्य सरकार तुमच्या पाठीशी!`

परतीच्या पावसाने शेती व शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकार सक्रीय आहे. ते मदत देणारच, मात्र केंद्र सरकारने देखील भरीव मदत केली पाहिजे. या संकटातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची संयुक्त मदत लागेल.
शेतक-याला धीर देत भुजबळ म्हणाले, `राज्य सरकार तुमच्या पाठीशी!`

नाशिक : परतीच्या पावसाने शेती व शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकार सक्रीय आहे. ते मदत देणारच, मात्र केंद्र सरकारने देखील भरीव मदत केली पाहिजे. या संकटातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची संयुक्त मदत लागेल, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

श्री. भुजबळ यांनी आज इगतपुरी तालुक्यातील अतीवृष्टीग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतक-यांशी चर्चा केली. खंबाळे येथे भात पीकांचे झालेले नुकसान पाहिल्यावनंतर त्यांनी शेतक-यांशी चर्चा करुन माहिती घेतली. त्यांना धीर देऊन राज्यसरकार या संकटाच्या काळात शेतकरी व शेतीच्या मदतीसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असे आश्वासन दिले. 

शरद पवार यांनी नुकताच उस्मानाबाद व अन्यत्र पाहणी दौ-यात पंतप्रधानांची भेट घेऊन अतीवृष्टीग्रस्तांना मदत करण्याची विनंती करणार असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर श्री. भुजबळ म्हणाले, कोणतेही मोठे संकट, आपत्ती आल्यावर केंद्र सरकारला मदत करावी लागते. अतीवृष्टीने महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात राज्य सरकार मदत करनारच. शरद पवार आणि मुख्यमंत्री स्वतः पाहणी करीत आहेत. मात्र कोरोनामुळे मोठा निधी खर्च होत आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी वीस हजार कोटींचा निधी खर्च झाला आहे. केंद्र शासनाकडून जीएसटी पंचवीस हजडार कोटी रुपये येणे आहे. ते अद्याप केंद्र सरकारने दिलेले नाही. अर्थात केंद्र सरकाकडेही अडचणी आहेत. मात्र सध्याच्या स्थितीत राज्यातील सर्व खासदारांना घेऊन केंद्र सरकारकडे मदत मागीतली पाहिजे. मोठ्या आपत्तीत केंद्र सरकारला मदत करावी लागते. त्यादृष्टीने केंद्र सरकारकडे मदत मागण्यात येईल. सध्याच्या संकटाला राज्य व केंद्र दोन्ही सरकारने एकत्रीत सामोरे गेले पाहिजे. शेती व शेतक-याला मदत करावी लागेल.

यावेळी शेतक-यांनी यंदा कोरोनामुळे अनेक शेतक-यांना पीकविमा रक्कम बॅंकेत अदा करता आली नाही. कोरोनामुळे बॅंका बंद होत्या. शेतक-यांकडे देखील पैसे नव्हते. अशा विविध अडचणी होत्या. याशिवाय विमा कंपन्या भरपाई देताना विविध निकष लावतात. त्यात अनेक नुकसानग्रस्त शेतकरी अपात्र ठरतात. याबाबत राज्य शासनाने विमा कंपन्यांना सुचना द्याव्यात. प्रशासनाने यासंदर्भात लक्ष घालावे, अशी मागणी केली. याबाबत मंत्री मंडळाच्या बैठकीत तशा सूचना करुन याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन भुजबळ यांनी शेतक-यांना दिले. शेतक-यांनी श्री भुजबळ यांनी पाहणी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. 
....

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bl7iSKLQpdYAX_x7vpo&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=809d99bb219333b8f61e5ae0e50ae5e5&oe=5FB37F27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com