फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसात पेमेंट मिळेल

येत्या आठ दिवसात फसवणूक झालेल्या शेतकाऱ्यांचे पेमेंट कंपनीने करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे मिळतील, त्यांनी संयम ठेवावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : शिवसाई एक्सपोर्टकडून नेमलेल्या कंत्राटदाराने शेतकऱ्यांचे पैसे वेळेत दिलेले नाही. (Shivsai Export compony delayed farmers payments) याबाबत कंपनीकडे तक्रार प्राप्त झाली आहे. (Complain Recived componey) येत्या आठ दिवसात फसवणूक झालेल्या शेतकाऱ्यांचे पेमेंट कंपनीने करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे मिळतील, त्यांनी संयम ठेवावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले. 

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांतअधिकारी व लासलगाव पोलीस स्टेशन येथे कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कंपनीचे मालक व व्यवस्थापकांना व शेतकऱ्यांना बोलवून बैठक घेत दाखल झालेल्या तक्रारीबाबत आढावा घेतला. यावेळी शिवसाई एक्सपोर्ट कंपनीचे मालक संभा शिवाराव, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश चौधरी, शिवदास आव्हाड यांसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शिवसाई एक्सपोर्ट कंपनीने शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला वेळेत पेमेंट दिले आहे. मात्र कंत्राटदाराने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे न देता फसवणूक केली आहे. याबाबत कंपनीच्या वतीने कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून कंपनी शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे आठ दिवसांच्या आत देईल असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच आजवर गेल्या चार वर्षात कंपनीने २४० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला असून कंत्राटदाराने शेतकऱ्यांची १३ लाख रुपयांची फसवणूक केली असून यातून कंपनीला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन कंपनीने नेमलेल्या कंत्राटदरकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्या कंत्राटदारावर कंपनीकडून कारवाई करण्यात येणार असून त्याच्याकडून शेतकऱ्यांच्या पैशांची वसुली करण्यात येणार आहे. शिवसाई एक्सपोर्ट कडून शेतकऱ्यांचा २० तारखेपर्यंत मोबदला देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com