छगन भुजबळांनी सोडवला भाजीबाजाराचा जटील प्रश्न ! - Chhagan Bhujbal Resolve Vegitable markets Cpmplicated Issue | Politics Marathi News - Sarkarnama

छगन भुजबळांनी सोडवला भाजीबाजाराचा जटील प्रश्न !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने गेले अनेक महिने राजकीय वादामुळे जटील बनलेला आकाशवानी पिरसराच्या भाजी बाजाराचा प्रश्न आज सुटला. वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वाहनतळासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे नागिरकांनी समाधान व्यक्त केले.

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने गेले अनेक महिने राजकीय वादामुळे जटील बनलेला आकाशवानी पिरसराच्या भाजी बाजाराचा प्रश्न आज सुटला. वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वाहनतळासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे नागिरकांनी समाधान व्यक्त केले. 

शहरातील आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असून भाजी विक्रेते व महानगरपालिका यांच्यात वाद अधिक चिघळला होता. यासंदर्भात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे महापलिका आयुक्त व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत न्यायालयीन आदेशाचे पालन करून आकाशवाणी भाजी मार्केट आहे त्याच ठिकाणी सुरु ठेवून याठिकाणी पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव व सबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आकाशवाणी भाजी मार्केटच्या प्रश्नांवर भाजी विक्रेत्यांनी पालकमंत्री  भुजबळ यांना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी काढण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत आज पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत आकाशवाणी भाजी मार्केट येथील भाजी विक्रेत्यांना आहे त्याच ठिकाणी भाजी विकण्याची परवानगी देण्यात यावी. येथील पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात नियोजन करून महानगरपालिकेकडून स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करून देण्यात यावी असे निर्देश महापलिका आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहे. त्यामुळे आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न निकाली निघाला आहे

आज भुजबळ फार्म कार्यालय येथे झालेल्या बैठकीत नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ, महापलिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त विजय पगार, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नगर रचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजू आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ, संजय खैरनार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
,,,
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख