नाशिकच्या शाश्वत वैशिष्ट्यांचा विकास करणार

‘नाशिक 151’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : जिल्ह्याच्या स्थापनेला यावर्षी 151 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात ‘नाशिक 151’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नाशिक 151’ बाबत प्रस्तावित कार्यक्रमांसंदर्भात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे उपस्थित होते. ते म्हणाले, ‘नाशिक 151’ या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी आपल्या जिल्ह्यास 25 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आदिवासी कलेपासून पैठणीपर्यंत तर शेतीपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत अशा सर्व घटकांना एकत्रित व्यासपीठ मिळावे असे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बहुसांस्कृतिक वैशिष्ट्यांचे प्रदर्शन व परिचयासाठी ते जगासमोर आणण्यासाठी कायमस्वरूपी असे प्रदर्शन केंद्र तयार करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाविन्यपूर्ण प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल. संबंधित विभागांच्या मदतीने नाशिक 151 अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये दूरगामी सुविधा असणारे प्रकल्प तयार करण्यात येतील. यातून नाशिकचा ठसा सर्वत्र उमटेल. 

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर भर असेल. यानिमित्ताने विविध महोत्सव होणार आहेत. त्यादृष्टीने तीन टप्प्यात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र तयार करण्यात येईल. यादरम्यान कलाग्राम, बोटक्लब व क्रिडा संकुल या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात येणार असून जिल्ह्यातील कृषी, गायन, साहित्य, पर्यटन, क्रिडा अशा विविध घटकांचा महोत्सव साजरा करण्यात येईल. नाशिक हेरिटेज गार्डन, रामसृष्टी प्रकल्प, लेझर शो आणि  नाशिक जिल्ह्याच्या 150 वर्षातील प्रगतीचे टप्पे दर्शविणा-या कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राची निर्मीती करण्यात येणार आहे. 

यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी आदी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com