खुल्या आरक्षणांमुळे छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला - Chhagan Bhujbal political credit in Yeola. Nashik Shivsena politics | Politics Marathi News - Sarkarnama

खुल्या आरक्षणांमुळे छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला

संतोष विंचू
गुरुवार, 28 जानेवारी 2021

मातब्बर नेत्यांच्या ग्रामपंचायती असल्याने सरपंच पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळेल. त्यामुळे आगामी काळात सत्ता काबीज करण्यासाठी राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. 

येवला : आज तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये मोठ्या व मातबरांच्या तब्बल ४८ ग्रामपंचायती सर्वसाधारण राहिल्या. या सर्व मातब्बर नेत्यांच्या ग्रामपंचायती असल्याने सरपंच पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळेल. त्यामुळे आगामी काळात सत्ता काबीज करण्यासाठी राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. 

येवला तालुक्यात २४ ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, दहा अनुसूचित जमाती तर ७ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. आता यातील कोणत्या ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव होतील याकडे लक्ष लागून आहे.
येथील तहसील कार्यालयात तहसीलदार प्रमोद हिले,नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले,भाऊसाहेब हावळे आदींच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे आपले गाव कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार हे ऐकण्यासाठी सभागृह नागरिकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते.
येवला मतदारसंघात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ विद्यमान आमदार आहेत. मतदारसंघात त्यांची चांगली पकड आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील मोठा भाऊ शिवसेना येथे त्यांच्या विरोधात आक्रमकपणे मैदानात असतो. यापूर्वी पंचायत समितीसह विविध संस्थांत शिवसेनेचे प्राबल्या होते. शिवसेनेचे नेते संभाजी पवार, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांसह विविध नेते सक्रीय आहेत. त्यामुळे तालुक्यात सरपंचपदासाठी राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि शिवसेनेत गावोगावी संघर्ष बघायला मिळतो. यंदा मोठ्या गावांतच सरपंचपदज खुले असल्याने पुढील आठवड्यापासून राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. त्यात मंत्री भुजबळ यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.   

आजच्या सोडतीत अनकाई, अनकुटे, जळगाव नेऊर, पांजरवाडी, पिंपळगाव लेप, सावरगाव, शिरसगाव लौकी, वाघाळे, आडगाव चोथवा, आडसुरेगाव, आंबेगाव, अंदरसुल, अंगणगाव, अंगुलगाव, बाबुळगाव खुर्द, भाटगाव, बोकटे, चांदगाव, चिचोंडी बुद्रुक, देवठाण, देवगाव, डोंगरगाव, एरंडगाव खुर्द, गवंडगाव, जउळके, खैरगव्हाण, खिर्डीसाठे, कोटमगाव खुर्द, कोटमगाव बुद्रुक, महालखेडा पाटोदा, ममदापुर, मुरमी, नगरसुल, नागडे, नांदेसर, नांदूर, निळखेडे, पिंपळगाव जलाल, पुरणगाव, राजापूर, सायगाव, साताळी, सत्यगाव, सोमठाणदेश, तळवाडे, ठाणगाव, उंदिरवाडी ही ४८ गावे सर्वसाधारण झाल्याने येथे सरपंचपदासाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे. 
याशिवाय विखरणी, आडगाव रेपाळ, बाळापुर, बल्हेगाव, भारम, देवळाने, देशमाने बुद्रुक, गुजरखेडे, कानडी, खामगाव, कुसमाडी, मनोरी बुद्रुक, मातुलठाण, निमगाव मढ, पारेगाव, पाटोदा, सातारे, नायगव्हाण, धामोडे, पिंपरी, कुसुर, गारखेडे, कातरणी, आहेरवाडी या ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख