नाशिकला मिरवणुकीसह होणार शिवजयंती उत्सव

कोरोनामुळे विविध बंधने असली तरीही पुरेशी खबरदारी घेऊन शहरातील पारंपारीक शिवजयंती मिरवणुकांना परवानगी देण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रशासनाला दिल्या. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीवरील अनिश्चिततेचे सावट दुर झाले आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : कोरोनामुळे विविध बंधने असली तरीही पुरेशी खबरदारी घेऊन शहरातील पारंपारीक शिवजयंती मिरवणुकांना परवानगी देण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रशासनाला दिल्या. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीवरील अनिश्चिततेचे सावट दुर झाले आहे. 

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील शिवजयंतीची जोरदार तयारी सुरु आहे. शहरात नाशिक रोड, नाशिक शहर, सिडको आणि देवळाली कॅम्प या पारंपारीक मिरवणुका काढल्या जातात. दरवर्षी त्यासाठी शिवजयंती उत्सव समिती स्थापन केली जाते. या समित्यांच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या नियुक्तीसाठी चढाओढ लागलेली असते. यामध्ये लोकप्रतिनिधींचाही सहभाग असतो. सर्वच राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी या मिरवणूकीत सहभागी होण्यासाठी अग्रभागी असतात. विशेषतः नाशिक रोड शिवजयंती उत्सव समितीला दिर्घ इतिहास आहे. या समितीत सहभागी होण्यासाठी, पदाधिकारी होण्यासाठी तीव्र राजकीय स्पर्धा असते. यंदा या समितीवर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे विक्रम कोठुळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्याला राजकीय, सामाजिकदृष्ट्या महत्व आहे. 

यंदा कोरोनाचे सावट व त्यामुळे सार्वजनित उत्सवावरील निर्बंध अद्याप संपलेली नाही. त्यामुळे यंदा शविजयंती होणार की नाही याविषयी उत्सुकता होती. या मिरवणुकांना परवानगी मिळावी यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केल्यावर या समित्यांच्या पदाधिका-यांनी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे आणि शिवजयंती समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. त्यात पालकमंत्री भुजबळ यांनी शहरातील पारंपारीक मिरवणूकांना सशर्त परवानगी देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. 

मिरवणुक काढताना प्रशासकीय नियम व कोरोनाविषयक उपाययोजनांची बंधने पाळली जावे. सॅनीटायझर्स, मास्क, सामाजिक अंतर पाळले जावे. यासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केले जावे असे आवाहन करण्यात आले. नाशिकरोड शिवजन्मोत्सव उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष विक्रम भाऊ कोठुळे आणि पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री भुजबळ यांना केलेल्या विनंतीला पालकमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामुळे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांचे आभार मानले. 
यावेळी राष्ट्रवादी कॅांग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक रोड शिवजयंती उत्सव समितीचे अद्यक्ष विक्रम कोठुळे, चेतन शेलार, पवन मटाले, बाळा निगळ, नगरसेवक योगेश शेवरे, मुकेश शहाणे,  सागर देशमुख, राहूल कदम, रोहीत चव्हाण, राम सुर्यवंशी,  सागर गवळी, सुहास गडाख आदी उपस्थित होते. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com