पालकमंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने महापालिका कर्मचारी खुष ! - Chhagan BHujbal given relief to NMC Workers | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने महापालिका कर्मचारी खुष !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

सध्या महापालिका कर्मचारी दिवाळीला बोनस मिळेल की नाही, वेतन निश्चिती होईल की नाही, या विवंचनेत आहेत. महापालिकेत शिवसेना, सीटू यांसह विविध संघटना आहेत. त्यामुळे अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दुर केली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचारी चांगलेच खुश आहेत.

नाशिक : सध्या महापालिका कर्मचारी दिवाळीला बोनस मिळेल की नाही, वेतन निश्चिती होईल की नाही, या विवंचनेत आहेत. महापालिकेत शिवसेना, सीटू यांसह विविध संघटना आहेत. त्यामुळे अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दुर केली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचारी चांगलेच खुश आहेत. 

सातव्या वेतन आयोगानुसार महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे दिवाळीपूर्वी वेतन निश्‍चिती करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नसल्याचा दिलासा त्यांनी शिष्टमंडळाला दिला. यामुळे महापालिकेचे कर्मचारी चांगलेच खुश झाले असून त्यांच्यात उत्साह संचारला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष वेतनश्रेणी लागू करण्याच्या सूचना शासनाने दिल्याने अधिकाऱ्यांच्या वेतनात अपेक्षित वाढ होणार नाही. तर अनेकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणेच नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दहा टक्के वाढीसह सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतु नाशिक महापालिकेत अद्यापही तो लागू न झाल्याने त्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी महापालिकेतील कर्मचारी संघटनांनी केली. त्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नसल्याचा दिलासा त्यांनी दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आदेशाचा अभ्यास करून १४ नोव्हेंबरपर्यंत वेतन निश्चिती करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.
...
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख