रुग्णालयाला भेट दिल्यावर छगन भुजबळ सुन्न झाले

महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

ही घटना समजल्यावर श्री. भुजबळ तातडीने मुंबईहून नाशिकला आले. त्यांनी लगेचच दुपारी १२.३० ला या रुग्णालयास भेट दिली. ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरच्या माध्यमातून रिफिलिंग करत असतांना ऑक्सिजन गळतीची झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नगरगोजे, डॉ. आवेश पलोड, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले की, कोरोना विरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद आहे. या रुग्णालयाची रुग्ण क्षमता १५० आहे. रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण १५७ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात १३१ ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७ रुग्णांपैकी ६३ अतिशय आजारी होते. १२.३० सुमारास याठिकाणी गॅस गळतीची घटना घडली. त्यानंतर १.३० पर्यंत पुन्हा जोडणी करण्यात आली. या दरम्यान दुर्दैवाने यातील २२ रुग्ण मृत्युमुखी पडले. यातील ११ व्हेंटिलेटरवर असलेले व ११ ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. 

ते पुढे म्हणाले की, घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. कोरोना विरुद्ध लढाई लढत असतांना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून  राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये एक आयएएस अधिकारी एक  इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ञ,आणि एक सिनियर डॉक्टरचा  समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१० लाखांची मदत 
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख  व महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येईल. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आपलं काम थांबणार नाही. अधिक नियोजन करून लढा सुरू राहील. या घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यात नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे. 
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com