छगन भुजबळांसाठी दाढी वाढविणारे पैठणकर गावातच पराभूत

राज्याचे अनन व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर `ईडी` ची कारवाई झाली तेव्हा त्यांना जामीन मिळेपर्यंत दाढी वाढविण्याचा निश्चाय सुनिल पैठणकर यांनी केला होता. त्यांनी सलग दोन वर्षे दाढी केलीच नाही. मात्र हेच पैठणकर आपल्या पत्नीसहनगरसूल ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र मतदारांचे मन जिंकु शकले नाही.
Sunil Paithankar
Sunil Paithankar

नगरसुल : राज्याचे अनन व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर `ईडी` ची कारवाई झाली तेव्हा त्यांना जामीन मिळेपर्यंत दाढी वाढविण्याचा निश्चाय सुनिल पैठणकर यांनी केला होता. त्यांनी सलग दोन वर्षे दाढी केलीच नाही. त्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले. मात्र हेच पैठणकर आपल्या नगरसूल ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र मतदारांचे मन जिंकु शकले नाही. त्यांचा पत्नीसह पराभव झाला. हा पराभव चर्चेचा विषय ठरला. 

भुजबळांचे कट्टर समर्थक पैठणकर यांची छायाचित्रे सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली होती. आता भुजबळांच्या बालेकिल्ला असलेल्या येवल्यात नगरसूल ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांनी उमेदवारी केली, मतदारांनी पैठणकर पराभूत झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुनिल पैठणकर यांच्या विरोधात त्यांचे पुतने अमय पैठणकर विजयी झाले. पत्नी उज्ज्वला सुनिल पैठणकर यांच्या विरोधात अनिता राजेंद्र पैठणकर विजयी झाल्या. पैठणकरांच्या पॅनेलचे अवघे तीन सदस्य विजयी झाले.

श्री. भुजबळ यांचे राज्याच्या विविध भागात पाठीराखे व समर्थक आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या येवला मतदारसंघात देखली आहेत. न्यायडोंगरी (येवला) येथली सुनिल पैठणकर हे देखील त्यांचे समर्थक. त्यांची चर्चा राज्यभर झाली होती. त्याचे कारण होते, श्री. भुजबळ यांच्याविरोधात `ईडी` ने कारवाई केली. तेव्हा ते जवळपास दोन वर्षे कारागृहात होते. त्यांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या समर्थकांनी अनेक प्रयोग केले. त्यात सुनिल पैठणकर यांनी श्री. भुजबळ यांना जामीन मिळेपर्यंत दाढी वाढवण्याचा संकल्प केला होते. तो त्यांनी तडीस देखील नेला. श्री. भुजबळ यांना जामीन मिळाल्यावर त्यांनी पैठणकर यांचे कौतुक करीत त्याचा सत्कार केला. तेव्हा समारंभपुर्वक पैठणकर यांनी दाढी काढली होती.   
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com