छगन भुजबळांची मागणी, आणखी तीन महिने गरजूंना मोफत अन्नधान्य पुरवा

अजुनही फार मोठा वर्ग कोरोनामुळेअडचणीत आहे. त्यांना मदतीसाठी केंद्र शासनाने आणखी तीन महिने मोफत धान्याचा पुरवठा सुरु ठेवावा, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
छगन भुजबळांची मागणी, आणखी तीन महिने गरजूंना मोफत अन्नधान्य पुरवा

नाशिक : कोरोनाचा संसर्ग अजुनही नियंत्रणात आलेला नाही. देशाच्या अर्थचक्राला गती येण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजुनही फार मोठा वर्ग अडचणीत आहे. त्यांना मदत करण्यासाठी केंद्र शासनाने आणखी तीन महिने गरजूंना मोफत अन्न धान्याचा पुरवठा सुरु ठेवावा, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.   

केंद्रीय अन्न, पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. ते म्हणाले, कोविड - १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात आला. मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम आहे. अजून  गरीब नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे या योजनेस जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात यावी.

यासंदर्भात श्री. भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोविड - १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केल्याने नागरिकांच्या उपजिविकेवर मोठा परिणाम झाला. या परिस्थितीत केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जून २०२० या कालावधीत प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

श्री. भुजबळ म्हणतात, मात्र अजुनही देशात कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र शासनाच्या वतीने जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने अनलॉक प्रक्रिया जरी सुरु केलेली असली तरी देशातील अर्थचक्राला गती येण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुरु असलेले मोफत धान्य वितरण जुलै ते सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सुरु ठेवावे. त्यामुळे राज्यातील गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळेल.

...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com