चंद्रकांत दादांनी ठाम मत  ठेऊन वाघाशी मैत्री  करावी  - Chandrkant Patil fix his view then talk to tiger for freindsheep, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत दादांनी ठाम मत  ठेऊन वाघाशी मैत्री  करावी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मत सतत  बदलत असते. ते कधीही ठाम नसतात. आताही त्यांनी ठाम मत ठेवून वाघाशी मैत्री करण्यासाठी त्या पक्षाकडे जावे. त्यानंतरच मैत्री करावी, असा टोला  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला.

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president doesn`t fix on his statement) यांचे मत सतत  बदलत असते. ते कधीही ठाम नसतात. आताही त्यांनी ठाम मत ठेवून वाघाशी मैत्री (He shall fix his view then go to tiger for freindship) करण्यासाठी त्या पक्षाकडे जावे. त्यानंतरच मैत्री करावी, असा टोला  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज पक्षाच्या जळगाव येथील कार्यालयात कार्यक्रम झाला. यावेळी श्री. खडसे यांच्या हस्ते पक्षाचे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. खडसे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बावीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे.  या कालावधीत पक्षाने अनेक चढउतार पाहिले आहेत. पक्ष वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झालेत. परंतु अजूनही पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता आपला पक्ष वाडे, वस्ती, तांडयांपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाघाशी दोस्ती करण्याबाबत विधान केले होते. त्याचा श्री. खडसे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचे मत कधीही ठाम नसते. त्यांची भूमिका सतत बदलत असते. ते आज एक तर उद्या दुसरेच काही तरी बोलतात. त्यांच्या या बदलत्या भूमिकेमूळे त्यांच्या कोणत्या भूमिकेवर विश्वास ठेवावा असा संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे श्री. पाटील यांनी आधी आपले मत ठाम करावे. त्यानंतर त्या पक्षाकडे जाऊन चर्चा करावी. 
...

हेही वाचा...

`त्या` महिला सरपंचाने मंगळसूत्र गहान ठेऊन गावाचे वीज बील भरले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख