Chandrakant Patil
Chandrakant Patil

चंद्रकांतदादा म्हणतात, थांबा, मला राज ठाकरेंची भाषणे ऐकू द्या!

राज ठाकरे महाराष्ट्रातील आश्वासक नेते आहेत. विद्यार्थिदशेपासून त्यांच्याशी परिचय आहे. त्यांच्याशी आज जी भेट झाली त्यात काही फक्त हवापाण्याची चर्चा झाली नाही, तर राजकीय चर्चा झाली.

नाशिक : राज ठाकरे महाराष्ट्रातील आश्वासक नेते आहेत. (Raj Thakre is delivering leader of Maharashtra) विद्यार्थिदशेपासून त्यांच्याशी परिचय आहे.  ( I know him from student politics)  त्यांच्याशी आज जी भेट झाली त्यात काही फक्त हवापाण्याची चर्चा झाली नाही, तर राजकीय चर्चा झाली. ( I see him esterday and political discussion also took place) त्यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ घेतला जातो, असे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मी स्वतः त्यांची चाळीस-पन्नास भाषणे ऐकणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. 

श्री. पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यात, काय चर्चा झाली याविषयी विचारले असता, श्री. पाटील बोलत होते. ते म्हणाले, की राज ठाकरे व आपल्यात काही हवापाण्याच्या गप्पांसोबत इतरही गप्पा झाल्या. त्यात राजकीय गप्पाही झाल्या.

श्री. ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे, तर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कामकाज करीत असल्यापासून म्हणजे आम्ही परस्परांना ४० वर्षांपासून ओळखतो. त्यांची वोटबँक मोठी आहे. चेहरा आश्वासक आहे. पण त्यांची परप्रांतीयांविषयीची भूमिका बदलली पाहिजे, असे भाजपचे मत आहे, तर स्वतः ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेविषयी चुकीच्या पद्धतीने मांडणी होते, असे त्यांचे म्हणणे आहे म्हणून मी स्वतः आता त्यांची चाळीस ते पन्नास भाषणे ऐकणार आहे.  
..

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com