शरद पवारांच्या स्वास्थ्यासाठी चांदोरीत अभिषेक !

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात काल यशस्वी शश्त्रक्रीया झाली. याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा देणारे संदेश व्हायरल होत आहे.
Chandori Puja
Chandori Puja

नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात काल यशस्वी शश्त्रक्रीया झाली. याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा देणारे संदेश व्हायरल होत आहे. चांदोरी (ता. निफाड) येथे देखील युवकांनी मोठ्या प्रामणात श्री. पवार यांना शुभेच्छा देणारे संदेश व्हायरल केले आहे. येथे एका युवकाने महादेवाच्या मंदिरात अभिषेक केला,   

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार रविवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता. पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाल्यावर काल सायंकाळी त्यांच्यावर यशस्वी शश्त्रक्रीया करण्यात आली. त्यासंदर्भात देशभरातून पंतप्रधानांसह अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी त्यांना संपर्क करुन लवकर बरे होण्यासाठी संदेश दिले होते. त्यात महाराष्ट्रातील युवक, कार्यकर्ते देखील मागे नाहीत. राज्यभरातून असंख्य संदेश व त्यांची विचारपुस करणारे संदेश त्यांना येत होते. या सर्व घडामोडींत श्री पवार मात्र नेहेमीसारखेच इतरांना चकवत श्री. पवार यांची मात्र आज सकाळपासून नेहेमीसारखीच दिनचर्या देखील सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर सगळीकडे समाधान व्यक्त केले जात आहे. 

या पार्श्वभूमीवर चांदोरी (निफाड) येथे सोशल मीडियावर `गेट वेल सून साहेब`, `प्रेम करणारी जमात बक्कळ हाय, यशस्वी शत्रक्रिया..!`, `असंख्य वार, अबाधित शरद पवार, हर वार का नाम शरद पवार`, `साहेब एक नाही असंख्य लोक तुमच्यावर प्रेम करतात,त्यातील मी सुध्दा एक`, `जगायला दुप्पट बळ देणारा माणूस...` `#ऊर्जा ` अशा आशयाच्या पोस्ट हॅशटॅग वरील संदेश व्हायरल करण्यात आले आहेत. सोमनाथ कोटमे या युवकाने गावातील महादेव मंदिरात अभिषेक केला. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com