सोनसाखळ्यांचा अट्टल चोर अन् त्याचा भाऊ पुण्यातील गर्भक्श्रीमंत!

सोमवारी रजेवर असलेल्या पोलिसाने पत्नीसह धाडस करुन सोनसाखळी चोरांना पकडले. यातील लातूरचा राजू राठोड याने किती सोनसाखळ्यांची चोरी केली याची गणतीच नाही. यातील पस्तीस गुन्हे त्याने कबुल केले.
सोनसाखळ्यांचा अट्टल चोर अन् त्याचा भाऊ पुण्यातील गर्भक्श्रीमंत!

नाशिक : सोमवारी रजेवर असलेल्या पोलिसाने पत्नीसह धाडस करुन सोनसाखळी चोरांना पकडले. यातील लातूरचा राजू राठोड याने किती सोनसाखळ्यांची चोरी केली याची गणतीच नाही. यातील पस्तीस गुन्हे त्याने कबुल केले. यातील सोने आपण पुण्यात राहणा-या गर्भश्रीमंत भावाल विकल्याची माहिती दिली.

राजू उर्फ राजाराम खेतू राठोड (वय ३६, लातूर) आणि नागेश रामप्पा बडगम (वय ३४, रायबाग, बेळगाव) यांना ताब्यात घेतल्यावर त्यांची चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर जी माहिती व संदर्भ पुढे आले, ते डोळे विस्फारणारे आहे. या दोघांचाही आंतरराज्य संपर्क व गुन्हेगारीचे जाळे आहे. आता पर्यंतच्या तपासात त्याने पस्तीस सोनसाखळ्या ओरबाडल्याचे कबुल केले. अद्याप किती गुन्ह्यांची कबुली मिळेल हे सांगता येत नाही. त्याचे एक आंतरराज्यीय नेटवर्क आहे.

राठोड हा अत्यंत सराईत व अट्टल सोनसाखळी चोर आहे. तो पोलिसांना चकवा देण्यात एव्हढा तरबेज आहे, की स्वतः पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यात त्याने जी माहिती दिली, पोलिसांचा जो गोंधळ निर्माण केला, त्याने चौकशी करणारेच गोंधळले. त्याचे वर्णन करताना आयुक्त पांडे म्हणाले, त्याची चौकशी करता करता शेवटी माझे तीन तास वाया गेले, अशीच माझी प्रतिक्रीया झाली होती. राठोडने मी सोनसाखळ्या चोरतो. ते सोने मी पुण्यात माझा गर्भश्रीमंत भाऊ राहतो, त्याला विक्री केले आहे, असे सांगितले. पुण्यातील त्याच्या भावाशी संपर्क केला असता, तो खरोखऱच गर्भश्रीमंत आहे. त्याच्या बीएमडब्ल्यू कार आहे. त्याने पोलिसांना सांगितले, की त्याचा भाऊ अत्यंत अट्टल चोर असून खोटे बोलून पोलिसांना सहज फसवतो. मी त्याला अनेकदा चोरी करणे सोडावे यासाठी मदत केली. मात्र तो सुधरत नाही. मी कधीही चोरीचे सोने घेतलेले नाही. त्यानंतर मात्र पोलिस चांगलेच त्रस्त झाले. ते अधिक काळजीपूर्वक माहिती घेऊन त्याची खातरजमा करीत आहेत. 
तलवारीसह करायचा प्रवास

राठोड याच्याकडे असलेल्या दुचाकीत नक्षीदार बनावटीची तलवार सापडली. ही तलवार मोटारसायकलमध्ये ठेऊन तो अनेक ठिकाणी फिरत होता. त्याच्याकडे सुरे, फायटर, मिरचीचे स्प्रे असे अनेक हत्यारे सापडली आहेत. त्यामुळे आता पोलिस शहरात दुचाकी तपासणीची मोहिम सुरु करणार आहेत. नागरिकांच्या दुचाकी फक्त हत्यारांची खातरजमा करण्यासाठी असेल. त्यात जास्ती जास्त तीस सेकंद वेळ जाईल. संशयीत वगळता इतरांची कागदपत्रे तपासली जाणार नाहीत. त्यात सामान्य नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त पांडे यांनी केले आहे. 
...
 

https://scontent.fpnq7-2.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=FRmeOaUL9k8AX_4GeJH&_nc_ht=scontent.fpnq7-2.fna&oh=e446950f0723dca5bd43cc733f2304a6&oe=5FAF8AA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com