कृषी विधेयके म्हणजे भाजपने लादलेले शेतक-यांवरील संकट! - Centre Governments Agriculture Bills are against Farmers | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी विधेयके म्हणजे भाजपने लादलेले शेतक-यांवरील संकट!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी व कामगार विरोधी विधेयके आणून शेतकरी वर्गाला संकटात लोटले आहे.  जोपर्यंत केंद्र सरकार शेतकरी विरोधी विधेयके मागे घेत नाही, तोपर्यंत कॅाग्रेस पक्ष आपले आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आज कॅाग्रेसतर्फे येथे देण्यात आला. 

नाशिक : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी व कामगार विरोधी विधेयके आणून शेतकरी वर्गाला संकटात लोटले आहे.  हे सरकार ज्यांनी त्यांना सत्तेच्या खुर्चीत बसवले, त्या शेतकरी व जनतेला विसरले आहे. मात्र जोपर्यंत केंद्र सरकार शेतकरी विरोधी विधेयके मागे घेत नाही, तोपर्यंत कॅाग्रेस पक्ष आपले आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आज कॅाग्रेसतर्फे येथे देण्यात आला. 

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज शहर, जिल्हा कॅाग्रेसतर्फे शहरात किसान अधिकार दिवस पाळण्यात आला. यावेळी शहरात धरणे आंदोलन झाले. यावेळी जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे यांनी नाशिक शहर व जिल्ह्यातून अनेक शेतकरी, नागरिक या आंदोलनात उतरले आहेत. गावोगावी सह्या संकलीत केल्या जात आहेत. किमान या नागरिकांच्या अपेक्षांचा भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करुन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे सांगितले. 

कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि एच. के. पाटील आज वर्धा येथे महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात सत्याग्रह करीत आहेत. त्याला पाठींबा म्हणून कोरोनाच्या पार्श्व भूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करीत नाशिक शहर , जिल्हा कॅाग्रेसतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाने नुकतेच मंजूर केलेले शेतकरी व कामगार विरोधी विधेयके मागे घेण्यात यावीत. विधेयके मागे घेईपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.  यासंदर्भात दोन कोटी सह्यांचे निवेदन श्रीमती सोनिया गांधी राष्ट्रपतीना देणार आहेत.  

यावेळी जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या नगरसेविका हेमलता पाटील, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, नगरसेविका आशाताई तडवी, वसंत ठाकुर, आर. आर. पाटील, लक्ष्मण धोत्रे, बबलु खैरे, अरुण दोंदे, मुन्ना ठाकुर यांसह विविध पदाधिकारी सहभागी झाले. 
...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख