अर्थसंकल्प म्हणजे फाटक्या खिशातून वाटलेली खिरापत - Central Budget is gifts from empty pocket. NCP politics | Politics Marathi News - Sarkarnama

अर्थसंकल्प म्हणजे फाटक्या खिशातून वाटलेली खिरापत

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

शेतकरी व महिलांची उपेक्षा करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यात केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन घोषणांचा पाऊस पाडला आहे. याचे सार म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चॅाकलेट दाखवुन देश विकायला काढला आहे.

नाशिक : शेतकरी व महिलांची उपेक्षा करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यात केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन घोषणांचा पाऊस पाडला आहे. याचे सार म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चॅाकलेट दाखवुन देश विकायला काढला आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी व्यक्त केली आहे. 

त्या म्हणाल्या, शेती क्षेत्रासाठी उत्पादन खर्चावर आधारीत दिडपट हमी भाव अशाच आश्वासनांवर 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. मात्र आज सात वर्षांनी देखील सरकार फक्त प्रयत्नशील असेल असे सांगते आहे. यापुढेही तीच फक्त आश्वासनांची मालिका कायम आहे. बाकी भारताची आर्थिक राजधानी मुंबई ज्या राज्यात आहे, अशा आपल्या महाराष्ट्रासाठी अर्तसंकल्पात योग्य तरतूद केलेली नाही. हक्काचे करपरतावा दिलेला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.  

सौ. बलकवडे म्हणाल्या, या सरकारच्या कामकाजाची पद्धत अतिशय गमतीदार आहे. यांनी अर्तसंकल्प जाहीर केला आहे. मात्र जाहीर केलेला अर्तसंकल्प वेगळा असतो. केलेली कामे वेगळी असतात. यांच्या बोलण्याच्या गोष्टी एकदमच वेगळ्या असतात. त्यामुळे या अर्तसंकल्पांबाबत एव्हढे मोठे प्रश्नचिन्ह आहे, की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांतच ताळमेळ नाही हे अर्थसंकल्पातून दिसते. त्यामुळे अर्तसंकल्प देशाच्या व्यवस्थेला, अर्थकारणासाठी व जनतेला निश्चित दिलासा व दिशा देणारा असोत. यांच्यासाठी मात्र हा एक इव्हेंट झालेला आहे. भाषणे करायची व अर्थसंकल्प वाचायचा असे झाले. या अर्थसंकल्पात अनेकदा महिला सबलीकरण, महिलांचे कल्याण, बचत गट याचा उल्लेख झाला. प्रत्यक्षात महिलेने अर्थसंकल्प सादर केला असला तरी त्यात महिलांसाठी काहीच दिलेले नाही. गेल्या सात वर्षातील जे अर्थसंकल्प झाले, त्यातील किती तरतुदी व घोषणा प्रत्यक्षात आल्या हा अभ्यासाचा विषय आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, हा अर्थसंकल्प फाटक्या खिशातून वाटलेली खिरापत आहे. 

सौ. बलकवडे पुढे म्हणाल्या, बॅंकांच्या विस्तारीकरण व सुधारणांसाठी या अर्थसंकल्पात तरतुद केली आहे. यावरुन या बॅंका कोणाच्या इशा-यावर चालतात. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे आणि जे अनेक लोक कर्ज बुडवून गेलेत, काही परदेशात निघून गेले हे कोणाचे कोण होते हे आता सांगायची गरज नाही. महिला बचत गट हा मुलभूत व दारीद्र्यरेषेखालील नागरिकांच्या उत्थानाचा महत्वाचा मार्ग आहे. यापूर्वीच्या युपीए सरकारने या तळातील घटकाच्या सबलीकरणासाठी बचतगटांच्या आर्थिक सहाय्यासाठी विशेष धोरण राबविले होते. सध्याच्या अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणाच्या योजना, त्यांचे सबलीकरण, अर्तपुरवठा याबाबत भरीव तरतुद करण्याची संधी अर्थमंत्री सीतारमण यांनी होती. ती संधी त्यांनी घालवली हे खेदाने नमुद करावे लागते.
...  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख