केंद्राने पाकिस्तानचा कांदा आणून शेतकऱ्यांना संकटात टाकले! - Center import Pakistani onion to harras Indian Farmers | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्राने पाकिस्तानचा कांदा आणून शेतकऱ्यांना संकटात टाकले!

संपत देवगिरे
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत, याचा थेट परिणाम आणि जाच कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक : केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत, याचा थेट परिणाम आणि जाच कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.  

श्री. भुजबळ म्हणाले, कांद्याच्या प्रश्नांबाबत भारत सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते महाराष्ट्र व इतर राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीचं ठरत आहेत. कधीतरी आता शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कांद्याला चांगले भाव मिळायला सुरवात झाली होती. तेव्हा नियम आणि अटी टाकून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.

कांदा उत्पादन करणारा शेतकरी हा अतिशय गरीब असतो, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव हा कधीतरी मिळतो पण भाव खाली आला तर मात्र कांदा अगदी फेकून द्यावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभावाचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवाल करून ते म्हणाले की, मधल्या काळात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवल होते. आता सर्व बाजारपेठा चालू झाल्या असताना, सुरवातीला केंद्राने निर्यात बंदी आणली. त्यानंतर इराण आणि पाकिस्तानचा कांदा भारतात आणला कांद्याच्या व्यापाऱ्यांवर अनेक ठिकाणी इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्यात आल्या. त्यानंतर कांदा साठवणुकीला मर्यादा आणण्यात आल्या अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

कांद्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती देखील  भुजबळ यांनी दिली.
...
 

https://scontent.fnag4-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख