उत्सव लसीचा की कोरोना आमंत्रणाचा? 

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यात सामाजिक अंतर, मास्कचा अभाव यांपासून तर अनेक नियमांचा उल्लंघन होत आहे. त्यामुळे कोरोना लस केंद्रावर कोरोनाला प्रतिबंध होण्याएैवजी प्रसार होतो की काय?, ही केंद्र कोरोनाची निमंत्रण केंद्र होतात की काय? अशी भिती निर्माण झाली आहे.
Jalgao Vaccine
Jalgao Vaccine

जळगाव : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यात सामाजिक अंतर, मास्कचा अभाव यांपासून तर अनेक नियमांचा उल्लंघन होत आहे. त्यामुळे कोरोना लस केंद्रावर कोरोनाला प्रतिबंध होण्याएैवजी प्रसार होतो की काय?, ही केंद्र कोरोनाची निमंत्रण केंद्र होतात की काय? अशी भिती निर्माण झाली आहे. 

शासनातर्फे टप्याटप्याने कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध केली जात आहे. मोठया शहरांप्रमाणे आता ग्रामीण भागात लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. केंद्र सुरू होण्याआधीच आपल्याला लवकर लस मिळावी यासाठी नागरिक पहाटेपासूनच प्रवेशद्वारावर गर्दी करतात. तासन तास रांगा लावून केंद्र सुरु होण्याची प्रतिक्षा करतात.  त्यामुळे केंद्राचे गेट उघडल्यावर एकच धावपळ उडते. केंद्रात धाव घेणाऱ्या नागरिकांच्या गर्दीने एखाद्या जत्रेप्रमाणे धावपळ, गोंधळ होतो. 

या केंद्रावर नोंदणी करण्यासाठी बांबूचे कठडे लावून रांगेत बसण्याची सोय केली आहे. मात्र लोक आपला नंबर लवकर यावायासाठी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यात मोठी पळापळ होते. पोलिस प्रशासनाला देखील नागरिक  जुमानत नाहीत. विशेष म्हणजे या गर्दीत अनेक जण मास्क लावण्याची तसदीही घेत नाहीत. जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीक चित्र आहे. अनेक केंद्रांवर असाच गोंधळ दिसून येतो. नागरिकांना धक्काबुक्की करीत लसीकरण करून घ्यावे लागते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला लसीचा उत्सव करा, असे आवाहन केले आहे. मात्र जनतेने लसीची जत्रा केली आहे. प्रशासन त्यांना कोणतेही नियम लावण्यास तयार नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर राज्यात, देशात कोरोना प्रसारातून भयावह स्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. 
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com