ब्रेकींग...`एचआरसीटी` चाचण्यांच्या दर निश्चितीसाठी समिती गठित

राज्यातील एच.आर.सी.टी. सह विविध वैद्यकीय चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील खाजगी रुग्णालयांत उपचार घेणा-या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
ब्रेकींग...`एचआरसीटी` चाचण्यांच्या दर निश्चितीसाठी समिती गठित

गोंदीया : राज्यातील एच.आर.सी.टी.सह विविध वैद्यकीय चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील खाजगी रुग्णालयांत उपचार घेणा-या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी चाचण्यांच्या दर निश्चितीसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांच्या समितीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. 

या समितीत आरोग्य सेवा आयुक्तालयाचे संचालक हे समितीचे सदस्य सचिव, तर  सर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि एल. टी. मेडिकल कॉलेज आणि सायन रुग्णालयातील रेडीओलॉजी विभाग प्रमुख डॉ. अनघा जोशी यांची समितीचे सदस्य आहेत. ही समिती राज्यातील खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांशी समन्वय साधून दर निश्चित करतील, असे आदेशात म्हटले आहे. 

राज्यातील खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमार्फत विविध उपचार, चाचण्यांसाठी रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जाते अशा तक्रारी येत होत्या. त्यात सतत वाढ होत होती. राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. राज्य शासनाने कोविड १९ या साथरोगाच्या कालावधीत एक आवश्यक बाब म्हणून विविध उपचार व चाचण्यांचे दर निश्चित केले होते. मात्र एच.आर.सी.टी. आणि एम.आर.आय.सह इतर काही चाचण्यांचा त्यात समावेश नव्हता. काही खाजगी रुग्णालये, वैद्यकीय संस्थांकडून या चाचण्यांसाठी अतिरक्त शुल्क आकारले जात होते. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. आता नव्या निर्णयामुळे राज्यात वैद्यकीय चाचण्यांच्या दरात समानता येण्यास सुरवात होईल. अतिरक्त शुल्क आकारणी थांबेल. समान दर निश्चितीमुळे नागरिकांना त्याचा  लाभ मिळेल. 

असे असतील चाचण्यांचे दर...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खाजगी दवाखान्यात सिटीस्कॅन करण्यासाठी सहा ते आठ हजार रुपये दर आकारला जात होता.  यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी  समिती गठीत केली. तपासणीचे दर सामान्यांना परवडणारे असावे या साठी आज `एचआरसीटी` शासकीय अध्यादेश काढला. यापुढे ६० स्लाइस चे दर दोन हजार रुपये तर ६० ते ६४ स्लाइस चे दर दोन हजार पाचशे रुपये आणि ६४ स्लाइस पेक्षा क्षमतेच्या सीटीस्कॅनचा दर तीन हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. यापुढे खाजगी डॉक्टरांनी निर्धारीत दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची येथे केली. त्याचा खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

राज्यमंत्री काय म्हणाले होते...
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी यापूर्वी अशी समिती स्थाप करण्यात येईल अशी घोषणा केली होती. यासंदर्भात यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांना तशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=IJjfSVQdRK0AX_M4VZT&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=b4fb1ae9731c3cabcc0e4752b2416de1&oe=5F93DB27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com