BJP`s most youth corporator Priyanka Ghate happily married | Sarkarnama

भाजपच्या सर्वात युवा नगरसेविका प्रियंका घाटे विवाहबद्ध

संपत देवगिरे
मंगळवार, 30 जून 2020

नाशिक महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सर्वात युवा नगरसेविका प्रियंका घाटे काल मुंबईतील इलेक्ट्रीकल इंजिनीअर अतुल जगताप यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. हा विवाह सोशल मिडीयावर विशेष चर्चेचा विषय ठरला. 

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या येथील सर्वात युवा नगरसेविका प्रियंका किशोर घाटे या काल मुंबईतील इलेक्‍ट्रीकल इंजिनीअर अतुल भागवत जगताप यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्स व अन्य बंधने पाळून मोजक्‍या उपस्थितीत हा विवाह झाला. यावेळी महापालिकेतील विविध पदाधिकारी तसेच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

नाशिक महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून प्रियंका किशोर घाटे निवडून आल्या होत्या. तेव्हा त्यांचे वय अवघे एकवीस वर्षे होते. त्यामुळे महापालिकेतील त्या सर्वात युवा नगरसेविका म्हणून चर्चेत आल्या. युवा असुनही त्यांनी विविध विषयांचा अभ्यास व नागरी समस्यांचा पाठपुरावा करुन कामकाजात आपली छाप पाडली होती. एम. ए. हे पदव्युत्तर शिक्षण असलेल्या प्रियंका यांनी शहराच्या विविध प्रश्‍नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते किशोर घाटे यांच्या त्या कन्या होत्या. कुटुंबीय व आप्तेष्टांच्या उपस्थितीत मुंबईतील नियोजित वर इंजिनिअर अतुल भागवत जगताप यांच्याशी त्यांचा नियोजीत विवाह झाला. श्री. जगताप मुंबईत खाजगी कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करतात. शहरतील सर्वात युवा नगरसेविका म्हणून त्या सातत्याने चर्चेत होत्या. त्यांच्या विवाहाला अनेकांनी हजेरी लावली. त्यांचे वडील श्री. किशोर घाटे हे शहरातील आक्रमक नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी यापूर्वीही पक्षातर्फे महापालिकेच्या निवडणूकीत उमेदवारी केली होती. मात्र त्यांना यश मिळाले नाही. 2017 मध्ये बहुसदस्यीय प्रभागात भाजपमध्ये प्रवेश करुन त्यांची कन्या मात्र नगरसेविका झाली. राजकारणात स्थिरस्थावर होतानांचा त्यांचा विवाह झाला. हा विवाह सोशल मिडीयावर चर्चेत होता. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख