रक्षा खडसेंनी केली महाजनांची पाठराखण; सत्ता गेली म्हणजे अपयशी ठरले, असे नाही  - BJP's loss of power in the Municipal Corporation does not mean that Girish Mahajan has failed: Raksha Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

रक्षा खडसेंनी केली महाजनांची पाठराखण; सत्ता गेली म्हणजे अपयशी ठरले, असे नाही 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 मार्च 2021

जळगाव महापालिकेत नेत्यांचे व भाजप नगरसेवकाचे चुकले असल्यास भविष्यात असे होऊ नये, यासाठी आता पक्षातर्फे काळजी घेतली जाईल.

जळगाव : "राजकारणात यश-अपयश येत असते. जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली असली तरी पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन अपयशी झाले, असे म्हणता येणार नाही,'' अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांनी जळगाव महापालिकेतील घडामोडींवर दिली. 

जळगाव महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे 27 नगरसेवक फुटले आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला मतदान केले आहे. त्यामुळे महापालिकेवर असलेली भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. 

भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनीही भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. नगरसेवक भाजप सोडून जाण्याला त्यांनी महाजनांना जबदर धरले होते. तसेच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही गिरीश महाजनांना हे नगरसेवक कंटाळले होते, असा आरोप केला होता. 

या प्रकरणावर खडसे यांच्या सूनबाई व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी मात्र नेते गिरीश महाजन यांची पाठराखण केली आहे. जळगावात संकटमोचक गिरीश महाजन अपयशी ठरले आहेत, असे आपणास वाटते का? याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, राजकारणात यश अपयश येतच असते. जळगाव महापालिकेत नेत्यांचे व भाजप नगरसेवकाचे चुकले असल्यास भविष्यात असे होऊ नये, यासाठी आता पक्षातर्फे काळजी घेतली जाईल. मात्र, सत्ता तिकडे प्रवाह असतो, हे राजकारणात साधारण दिसून येते. जळगाव महापालिकेत तेच घडले आहे. तरीही भारतीय जनता पक्षाच्या फुटलेल्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईलच, असा इशाराही त्यांनी या वेळी बोलताना फुटीर नगरसेवकांना दिला. 

हेही वाचा : नितीन राऊत हे दुबळे ऊर्जामंत्री 

सोलापूर : वाढीव वीज बिलांसदर्भात ऊर्जा खात्याने 50 टक्के वीजबिल माफीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत हे त्यावर ठामपणे भूमिका घेऊ शकले नाहीत. ते कॉंग्रेसचे दुबळे मंत्री आहेत. त्यातही मागासवर्गीय असल्याने बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत. या सर्वांमध्ये बारामती अडथळा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

सोलापुरात शनिवारी (ता. 20 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. या वेळी आंबेडकर यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्यावर टीका केली. 

आंबेडकर म्हणाले, वीजबिलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. विधानसभेत त्यांना घेराव घातला जाऊ नये; म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वीज कनेक्‍शन तोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, शेवटी पुन्हा वीज कनेक्‍शन तोडणीवरील स्थगिती हटवली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना संधी मिळाली आहे की त्यांनी खोटारड्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख