कार्यकर्त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावले अवघे भाजप! - BJP Workers family Finance assistance | Politics Marathi News - Sarkarnama

कार्यकर्त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावले अवघे भाजप!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

भारतीय जनता पक्षाचे माजी बागलाण तालुका अध्यक्ष, नामपूरचे माजी सरपंच (कै.) अण्णा सावंत यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला.

सटाणा : भारतीय जनता पक्षाचे माजी बागलाण तालुका अध्यक्ष, नामपूरचे माजी सरपंच (कै.) अण्णा सावंत यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. 

खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते नामपूर येथे शनिवारी  (कै.) सावंत यांच्या पत्नी कल्पना सावंत यांनी तो स्वीकारला. भाजपकडून एखाद्या कार्यकर्त्याच्या निधनानंतर कुटुंबीयांना धनादेश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जनसंघपासून भारतीय जनता पक्षाची प्रमाणिक सेवा करीत घरादारावर तुळशीपत्र वाहिलेले (कै.) अण्णा सावंत यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. त्यामुळे खासदार डॉ. भामरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पक्षाच्या या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पक्षीय पातळीवरून विशेष बाब म्हणून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा केला. डॉ. भामरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पक्षाने तत्काळ मंजुरी दिल्याने (कै.) सावंत यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली. 

यावेळी आमदार दिलीप बोरसे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी, प्रदेश सदस्य लक्ष्मण सावजी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, डॉ. शेषराव पाटील, लकी गिल, तालुकाध्यक्ष संजय देवरे, सटाणा शहराध्यक्ष राहुल सोनवणे बाजार समितीचे संचालक दीपक पगार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख