मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - BJP Workers and office bearors enters in NCP | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांच्या प्रवेशाची मालिकाच सुरु होण्याची शक्यता दिसू लागली आहे. आज मुंबईत भाजपच्या विविध कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात प्रवेश केला. 

शिक : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांच्या प्रवेशाची मालिकाच सुरु होण्याची शक्यता दिसू लागली आहे. आज मुंबईत भाजपच्या विविध कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात प्रवेश केला. 

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक उपस्थित होते. त्यांनी प्रेवश करणाऱे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे अजय मकवाना, हर्षल गुरव, प्रथमेश मिस्री, विनायक पोळके, सुनिल धुरी आदींनी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात प्रवेश केला. 

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते भाजप सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा त्यांनी केला होता. हे राजकीय विधान असल्याचे बोलले जात होते. मात्र कदाचीत असे घडू शकते असे चित्र दिसू लागले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विविध राजकीय नेते प्रयत्नशील आहेत. 
... 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख