जळगावच्या 27 बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी हालचाली

जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकावीत शिवसेनेच्या तंबूत दाखल झालेल्या २७ बंडखोर नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या भाजपकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत. बुधवारी विभागीय आयुक्तांकडे व्हिप बजावूनही पक्षादेश मोडल्याचे पुरावे सादर केले जाणार आहेत.
Girish Mahajan
Girish Mahajan

नाशिक : जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकावीत शिवसेनेच्या तंबूत दाखल झालेल्या २७ बंडखोर नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या भाजपकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत. बुधवारी विभागीय आयुक्तांकडे व्हिप बजावूनही पक्षादेश मोडल्याचे पुरावे सादर केले जाणार आहेत.

जळगाव महापालिकेत भाजपचे बहुमत असताना २७ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. भाजपच्या बंडखोर नगरसेवकांच्या भूमिकेमुळे राज्यभरात राजकीय भूकंप उडाला. यापूर्वी सांगली, मिरज महापालिकेतही असाच प्रकार घडला होता. २०१९ मध्ये नाशिक महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीतदेखील भाजपच्या काही नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकाविले होते. मात्र ऐनवेळी बंडखोरांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे सत्ता मिळविण्याचे मनसुबे फिस्कटले होते. जळगाव महापालिका निवडणुकीनिमित्त शिवसेना भाजपला भारी पडली; परंतु आता भाजपनेदेखील कायद्याचा आधार घेत जशास तसे उत्तर देण्याची तयारी केली आहे.

नगरसेवकपद रद्दचा प्रस्ताव
विभागीय आयुक्तांकडे बुधवारी नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालाणी व नाशिक महापालिकेतील भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांच्याकडे बंडखोर नेते अपात्र ठरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २७ बंडखोर नगरसेवकांना व्हिप म्हणजेच पक्षादेश बजावूनही विरोधात मतदान केल्याचे पुरावे सादर केले जाणार आहेत. वृत्तपत्रांमधून बजावण्यात आलेली नोटीस, प्रत्यक्षात घरावर चिकटविण्यात आलेली नोटीस, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठविण्यात आलेली नोटीस आदी पुराव्यांचा यात समावेश असेल.

...
जळगाव महापालिकेत भाजपसोबत बंडखोरी करत शिवसेनेत गेलेल्या २७ नगसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी कारवाई केली जाणार आहे. शिवसेनेने महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रचंड प्रमाणात घोडेबाजार केला आहे. ‘राज्यात आपले सरकार आहे, तुम्हाला काहीही होणार नाही’ असे सांगत भाजपच्या नगरसेवकांना फोडण्यात आले आहे; परंतु हे फार काळ टिकणार नाही. सर्व नगरसेवक अपात्र ठरतील, अशी व्यवस्था केली आहे.
- गिरीश महाजन, माजी मंत्री, जळगाव
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com