"भाजप'कडून नाशिकला दिल्लीसारखे मोहल्ला क्‍लिनिक  - BJP will starts Mohalla Clinics On Delhi Pattern | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

"भाजप'कडून नाशिकला दिल्लीसारखे मोहल्ला क्‍लिनिक 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

कोरोना संकटाच्या काळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्यासाठी भाजपच्या वैद्यकीय आघाडीतर्फे दिल्लीच्या धर्तीवर राज्यातही मोहल्ला क्‍लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ नाशिकमधून केला जाणार आहे. 

नाशिक : भारतीय जनता पक्ष एरव्ही सतत आम आदमी पक्षाला व त्यांच्या दिल्लीतील सरकारला ापण्यात पाहात असतो. मात्र "भाजप' "आप' पक्षाच्या दिल्लीतील मोहल्ला क्‍लिनिकचा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्याचा विचार करीत आहे.

यासंदर्भात कोरोना संकटाच्या काळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्यासाठी भाजपच्या वैद्यकीय आघाडीतर्फे दिल्लीच्या धर्तीवर राज्यातही मोहल्ला क्‍लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ नाशिकमधून केला जाणार आहे. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय आघाडीचे साडेतीन हजार डॉक्‍टर सेवा देत असल्याची माहिती भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे यांनी दिली. भाजप प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी येथील वसंतस्मृती कार्यालयात झाली.

माध्यम प्रतिनिधींना माहिती देताना डॉ. गोपछडे म्हणाले, की राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे दिसत असले तरी अद्यापही पुरेसा उपचार रुग्णांना मिळत नसल्याने मोहल्ला क्‍लिनिक सुरू केले जाणार आहे. मोहल्ला क्‍लिनिकच्या माध्यमातून गरिबांना मोफत उपचार दिले जातील. कोरोनासारख्या आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय आघाडीने नियोजन केले आहे. राज्यातील सात विभागातील डॉक्‍टरांना एकत्र करून गावपातळीपर्यंत संघटन उभे केले जात आहे. यात सर्व पॅथीच्या डॉक्‍टरांचा समावेश राहील. या वेळी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. प्रशांत पाटील, होमिओपॅथी विभागाचे संयोजक डॉ. भालचंद्र ठाकरे, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, विलास भदाणे उपस्थित होते. 

साडेतीन हजार डॉक्‍टरांची टीम 

कोरोनासह आरोग्य आपत्तीचा सामना करण्यासाठी साडेतीन हजार डॉक्‍टरांची टीम तयार केली जाणार आहे. सध्या मुंबईत साडेसहाशे डॉक्‍टरांची टीम कार्यरत आहे. वैद्यकीय आघाडीची सेवा राजकारणविरहित आहे. यावेळी नाशिक शहर भाजपा वैद्यकिय आघाडीची कार्यकारिणी महानगर संयोजक डॉ. चंद्रशेखर नामपूरकर यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल, फार्मसीस्ट, पॅरामेडीकल अशा विविध तज्ञांचा समावेश शहर कार्यकारिणीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध समाजउपयोगी योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन भाजपा महानगर अध्यक्ष गिरीष पालवे यांनी यावेळी केले. 
... 

 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख