चंद्रकांत पाटील, भुजबळ वाद पेटला; राष्ट्रावादीकडून पाटलांच्या पुतळ्याचे दहण - BJP state president Chandrakant Patil's statue was burnt | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

चंद्रकांत पाटील, भुजबळ वाद पेटला; राष्ट्रावादीकडून पाटलांच्या पुतळ्याचे दहण

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 6 मे 2021

चंद्रकांत पाटील यांनी त्यांना तुमच्या केसेस न्यायालयात सुरू आहे, महागात पडेल अशी धमकी दिली होती.

जळगाव : अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोघांत कलगीतुरा रंगला आहे. चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना दिलेल्या धमकीच्या विरोधात पडसाद उमटू लागले आहेत. जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. (BJP state president Chandrakant Patil's statue was burnt)

छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगाल मधील विजया बद्दल अभिनंदन केले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, त्याचा राग येऊन चंद्रकांत पाटील यांनी त्यांना तुमच्या केसेस न्यायालयात सुरू आहे, महागात पडेल अशी धमकी दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तर्फे पाटील यांचा निषेध करण्यात आला. जामनेर येथे चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी चद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय गरूड तसेच जामनेर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामनेर हा भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचा मतदार संघ आहे. 

विखेंनी रेमडिसिव्हीर इंजेक्शन किती आणल? १० हजार? न्यायालयासमोर आला आकडा...
 

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

अंमलबजावणी संचालनालयाने छगन भुजबळ यांना जामीन मिळविण्यासाठी त्यांचे पुतणे समीर आणि मुलगा हे माझ्या बंगल्यावर तासनतास बसलेले असायचे, असा खळबळजनक आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 

राज्यात 2014 मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर भुजबळ यांच्यावर कारवाई झाली होती. त्यांना जामीन लवकर मिळत नव्हता. त्यांना दीड ते दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. हा जामीन लवकर व्हावा यासाठी समीर आणि पंकज हे माझ्याकडे आले होते आणि समीर तर बंगल्यावर तासनतास बसत होता, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता. छगन भुजबळ यांनी जास्त बोलू नये, अन्यथा महागात पडेल, अशी टिप्पणी पाटील यांनी केली होती. 

भाजपचा पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालात धुव्वा उडाल्यानंतर देशात घरोघरी मोदीच्या विरोधात वातावरण आहे, अशी टीका केली होती. त्यावर बोलताना छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल. बोलायचे असेल तर पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असे पाटील म्हणाले होते.

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख