भाजपाचे ज्येष्ठ नेते मोतीकाका परदेशी यांचे निधन

येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष व संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले ज्येष्ठ नेते मोतिसिंग (काका) भैयासिंग परदेशी यांचे आज वृद्धापकाळाने (वय ९०) निधन झाले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते मोतीकाका परदेशी यांचे निधन

येवला : येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष व संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले ज्येष्ठ नेते मोतिसिंग (काका) भैयासिंग परदेशी यांचे आज वृद्धापकाळाने  (वय ९०) निधन झाले.

श्री. परदेशी येवला नगरपालिकेत नाका कारकून म्हणून भरती झाले होते. मात्र समाजकारनाची आवड असल्याने त्यांनी नोकरी सोडून नगरपालिकेत नगरसेवकपदाची निवडणूक लढवली व  ते निवडून गेले.त्यानंतर दीर्घकाळ  नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. येवले शहराची आर्थिक सत्ता असलेल्या येवला मर्चंट बँकेत दीर्घकाळ संचालक आणि अध्यक्षपदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली.त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेत अनेक वर्ष सत्ता होती.

तालुक्यासह जिल्ह्यात ते मोतीकाका या नावाने ओळखत जात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात तयार झालेले मोतीकाका यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती.नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे दीर्घकाळ संचालक आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.

भारतीय जनता पार्टीत क्रियाशील पदाधिकारी म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी,केंद्रीय मंत्री व जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापर्यंत परिचय असलेले काका राज्याचे ज्येष्ठ नेते कै. गोपिनाथ मुंडे,माजी आरोग्य मंत्री डी. एस.आहेर,मंत्री वहाडने पाटील,माजी सभापती ना.स. फरांदे या मोठ्या राजकीय नेत्यांबरोबर त्यांनी काम केले. मुंडेसह कोणीही नेता येवल्यात आला तर काकांना भेटल्याशिवाय जात नसे. शहरात भाजपाचे संघटन करताना ग्रामीण भागातही भाजपाचे जाळे विणण्यात काकांचे योगदान राहिले आहे.
...
येवला ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकला
येवला नगरीचे माजी नगराध्यक्ष मोतीकाका परदेशी यांचे वृद्धापकाळाने निधन निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, भाजपचे काम करताना त्यांचे सर्वपक्षीय संबंध होते. त्यांच्या निधनाने येवला एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला कायमचा मुकला. - छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा मंत्री.
..

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=MpNSTcwoGU8AX8WVKIe&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=0a7615122e8d26547063d9843f8d7075&oe=5FA3AD27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com