भाजप हाच खरा आंदोलनजीवी पक्ष - BJP Is the Real Andolanjivi party. Chhagan Bhujbal politics | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप हाच खरा आंदोलनजीवी पक्ष

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

आंदोलनजीवी अशा पध्दतीने शेतकऱ्यांना  हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान - सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो.

नाशिक : आंदोलनजीवी अशा पध्दतीने शेतकऱ्यांना  हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान - सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

पुरवठा मंत्री भुजबळ यांचा आज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबार झाला. या उपक्रमाअंतर्गत प्रदेश कार्यालयात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन त्यांनी भाजपवर टीका केली. 

ते म्हणाले, आंदोलने ही देशभर नव्हे तर जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही असायचं, कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बसणे इत्यादी वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने त्यांनी केली. सभागृहातसुद्धाआंदोलने केली याची आठवण देखील छगन भुजबळ यांनी सांगितली.

लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते मग याव्यतिरिक्त आणखी दुसरं काय करायचं असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा इतिहास लक्षात घेतला तर हा पक्ष विरोधी पक्ष असतांना सतत सरकार विरोधात आंदोलनच करीत होता. लहान लहान विषयांवर आजही त्यांची आंदोलने सुरुच असतात. कुठे बांगड्या दे. कुठे फलक लिहायचे तर कुठे घोषणा द्यायच्या. अगदी विधीमंडळातही त्यांची आंदोलने पहायला मिळतता. त्यामुळे शेतक-यांचे प्रश्न काय आहेत हे समजून न घेता त्यांना हिणवणे अयोग्य आहे. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख