आमदारांच्या निलंबनाविरोधात धुळ्यात रास्ता रोको - BJP Rasta roko against suspension of BJP MLA, Maharashtra Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आमदारांच्या निलंबनाविरोधात धुळ्यात रास्ता रोको

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 जुलै 2021

`ओबीसी` आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचा आरोप करीत  भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिंदखेड्याचे  आमदार जयकुमार रावल यांचाही समावेष आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी शहरात रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला. 

धुळे : `ओबीसी` आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचा आरोप करीत (BJP MLA Agressive on OBC was suspended) भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिंदखेड्याचे  आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांचाही समावेष आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाले. (Followers angree on the decision)  त्यांनी शहरात रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला. 

यावेळी कार्यकर्त्यांनी विधिमंडळाचे तालीका अधिकारी व शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.  धुळे शिंदखेडा रस्त्यावर काही काळ भाजपच्या कार्यकर्त्यांना तर्फे रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला. 

`ओबीसी`च्या प्रश्नावर आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बाजू मांडू दिली नाही. तसेच अन्य सदस्यांना बोलायचे होते, मात्र त्यांना बालू दिले नाही. त्यामुळे या सदस्यांनी गोंधळ केला. त्यानंतर भाजपचे आमदार विधासभा उपाध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांनी श्री. जादव यांना त्याबाबत  जाब विचारला. यावेळी गोंधळ झाला. 

यामुळे आक्रमक झालेल्या भाजपच्या १२  आमदारांचे निलंबन करण्यात आले. निलंबीत आमदारांमध्ये सिंदखेडचे आमदार जयकुमार रावल यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने धुळे शिंदखेडा बाभळे फाट्यावर शिवसेनेचे जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा बाजी देखील करण्यात आली आहे.
...
हेही वाचा...

५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी विधानसभेचा ठराव

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख