"भाजप'ला झटका; निर्मला पवारांच्या हाती "मनसे'चा झेंडा !  - BJP Nirmala Pawar joins MNS Today in Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

"भाजप'ला झटका; निर्मला पवारांच्या हाती "मनसे'चा झेंडा ! 

संपत देवगिरे
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

भारतीय जनता पक्षाच्या माजी सैनिक, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. निर्मला पवार यांनी आज विविध समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या "मनसे' प्रवेशाने भाजपला मोठा झटका मानला जातो.

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या माजी सैनिक, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. निर्मला पवार यांनी आज विविध समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या "मनसे' प्रवेशाने भाजपला मोठा झटका मानला जातो. यानिमित्ताने यापूर्वी मनसेतून भाजपमध्ये झालेल्या आऊटगोईंगचा वचपा काढण्याचा मनसेला काही प्रमाणात यश आले. 

"मनसे'प्रमुख राज ठाकरे यांचे नेतृत्व आणि स्पष्ट राजकीय भूमिकेने प्रेरीत होऊन हा प्रवेश केल्याचे यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार आणि प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम झाला. पक्षाच्या राजगड कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात हा कार्यक्रम झाला. यावेळी नाशिकरोड भागातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसह "मनसे' पक्षात प्रवेश केला. 

यावेळी या कार्यकर्त्यांचे स्वागत डॉ. पवार यांनी केले. माजी महापौर मुर्तडक यावेळी ते म्हणाले, "कोरोना"मुळे राज्यात व देशात निर्माण झालेल्या परिस्थितीने नागरिक त्रस्त आहेत. उद्योग, व्यापार, व्यावसायांसह अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेकांचे रोजगार गेले. या संकटाच्या काळात राज्यातील सर्व प्रमुख पक्ष सत्तेत व्यस्त आहेत. विरोधक आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. जनतेच्या समस्यांविषयी त्यांना काहीही चिंता नवाही, अशी सध्याची स्थिती आहे. राज ठाकरे यांनीच या सर्व वि,यांवर अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे. या स्थितीतून बाहेर पडायचे असेल तर राज ठाकरे यांसारखी ठोस निर्णय व दुरदृष्टी असलेला नेताच सामान्य नागिरकांना आधार वाटतो. त्यामुळे अनेक पक्षांतील कार्यकर्ते मनसेकडे आकृष्ठ होत आहेत. नाशिक शहराच्या विकासासाठी ठाकरे यांनी केलेली कामे सर्वांसमोर आहेत. त्यानंतर सत्तेत आलेल्या नेत्यांनी या उत्तम विकासकामांचे काय केले, हे देखील सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. याचा विचार नाशिककरांकडून होईल. 

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंतसूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, सरचिटणीस संतोष पिल्ले, उपाध्यक्ष अक्षय खांडरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पद्मिनीताई वारे, वैशाली पोतदार, शहराध्यक्षा भानुमती आहिरे, अरुणा पाटील, उज्वला थुल, अनिता ठोक, आबा चौधरी, वाहतूक सेना शहराध्यक्ष निलेश सहाणे, संदेश जगताप, अक्षय कोंबडे, सिद्धेश सानप, बबलू ठाकूर आदी उपस्थित होते. 
... 
 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख