भाजपच्या कार्यकारीणीत पालवे अध्यक्ष, हिमगौरी आडकेंकडे महिला आघाडी - BJP Nashik city office bearers declairs, palve President | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या कार्यकारीणीत पालवे अध्यक्ष, हिमगौरी आडकेंकडे महिला आघाडी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

भारतीय जनता पक्षाच्या रेंगाळलेल्या कार्यकारीणीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मंजुरी दिली. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यी टिममध्ये नगरसेवकांना झुकते माप दिले आहे. महिला आघाडीची धुरा नगरसेविका हिमगौरी आडके- आहेर यांच्याकडे सोपविली आहे.

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या रेंगाळलेल्या कार्यकारीणीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मंजुरी दिली. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यी टिममध्ये नगरसेवकांना झुकते माप दिले आहे. महिला आघाडीची धुरा नगरसेविका हिमगौरी आडके- आहेर यांच्याकडे सोपविली आहे. प्रस्थापित तसेच अन्य पक्षातून आलेल्यांचा कार्यकारीणीत सन्मान झाला आहे. 

कार्यकारीणीत १२५ सदस्य असल्याने तीला जम्बो कार्यकारीणीच म्हणावे लागेल. त्यात अन्य पक्षातून आलेले माजी नगरसेवक, नेते आहेत. त्या तुलनेत मुळ भाजपच्या व जुन्या कार्यकर्त्यांना थोडेसे लांबच ठेवले आहे. गतवर्षी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे गिरीश महाजन यांच्याशी बिनसल्याने त्यांना पदावरुन दुर केले होते. श्री. सानप यांच्या शहराच्या राजकारणावर  चांगली पकड होती. त्यांच्या ताकदीचा अन्य नेता उपलब्ध नसल्याने सामाजिक समतोल म्हणून गिरीश पालवे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कार्यकारीणीची मान्यता वर्षभरापासून रखडली होती. तीला बुधवारी मुहूर्त लागला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकारिणीला हिरवा कंदील दाखविताना पक्षबांधणीसाठी माजी नगरसेवक व इतर पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. शहराध्यक्षपदी गिरीश पालवे कायम असून, महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी हिमगौरी आहेर-आडके यांची नियुक्ती करण्यात आली.

शहरातील काही आमदारांचा कार्यकारीणीतील काही सदस्यांच्या नियुक्तीस विरोध होता. त्यानंतर पक्षसंघटना, निष्ठा, संघटनेसाठी होत असलेले काम याचा विचार करून नियुक्त्या देण्यात आल्या. नवी कार्यकारिणी अशी, अध्यक्ष- गिरीश पालवे, उपाध्यक्ष- रामहरी संभेराव, बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, कुणाल वाघ, यशवंत निकुळे, सचिन ठाकरे, प्रकाश घुगे, ॲड. अलका जांभेकर, नीलेश बोरा. संघटन सरचिटणीस- नगरसेवक प्रशांत जाधव, सुनील केदार, पवन भगूरकर, माजी नगरसेवक जगन पाटील. चिटणीस- राजेश आढाव, छाया देवांग, नगरसेवक स्वाती भामरे, अजिंक्य साने, ॲड. श्‍याम बडोदे, अणित घुगे, कोशाध्यक्ष आशिष नहार.

निमंत्रितांमध्ये शहरातील तिन्ही आमदार 

भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मनीष बागूल यांच्याकडे सोपविताना महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी हिमगौरी आहेर-आडके यांची नियुक्ती करताना नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी शशांक हिरे, किसान मोर्चाची जबाबदारी हेमंत पिंगळे यांच्याकडे, तर अनुसूचित जमाती मोर्चाची जबाबदारी माजी नगरसेवक प्रा. परशराम वाघेरे यांच्याकडे सोपविण्यात आली. अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी फिरोज शेख, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रकांत थोरात यांच्याकडे देण्यात आली. विशेष निमंत्रितांमध्ये शहरातील तिन्ही आमदारांचा व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला.
....
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख