`बीजेपी मुक्ताईनगर` `एनसीपी मुक्ताईनगर` झाल्याने पंचाईत ! - BJP Muktainagar group became NCP Muktainagar | Politics Marathi News - Sarkarnama

 `बीजेपी मुक्ताईनगर` `एनसीपी मुक्ताईनगर` झाल्याने पंचाईत !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

पक्षांतराचे साईड इफेक्टस् नवे नाहीत. त्यातून निष्ठांवंतांची तर चांगलीच पंचाईत होते. असाच प्रकार मुक्ताईनगरला झाला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, नेत्यांचा `भाजपा मुक्ताईनगर` हा व्हाटस्अप ग्रुपचे एका रात्रीत `एनसीपी मुक्ताईनगर` झाला.

रावेर : पक्षांतराचे साईड इफेक्टस् नवे नाहीत. त्यातून निष्ठांवंतांची तर चांगलीच पंचाईत होते. असाच प्रकार मुक्ताईनगरला झाला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, नेत्यांचा `भाजपा मुक्ताईनगर` हा व्हाटस्अप ग्रुपचे एका रात्रीत `एनसीपी मुक्ताईनगर` असे नामकरण झाले. आता यामध्ये जे भाजपचे निष्ठावंत आहेत, त्यांच्यापुढे ग्रुपमधून लेफ्ट झाले तर वाईटपणा होतो. ग्रुपमध्ये राहिले तर गैरसमज होतो, अशी द्वीधा मनस्थिती झाली आहे. 

आधीच्या भारतीय जनता पक्षाच्या ग्रुपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी होते. आता बदललेल्या परिस्थितीत या व्हाट्सअप ग्रुपचे नावच बदलले. त्यामुळे असंख्य भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ग्रुपमध्ये आहेत. ते या ग्रुपमध्ये राहतात की लेफ्ट होतात, याचीच खुमासदार राजकीय चर्चा सुरू आहे. नावात काय आहे. तसेच व्हाटस्अॅप ग्रुपच्या नावात तरी काय आहे? असा उपदेश एखादा देऊ शकतो. मात्र पक्षनीष्ठा व त्यावरुन वरिष्ठ नेत्यांचे कान भरणारी मंडळी याचा काय व कसा ताप होतो, हे राजकारणात पडल्याशिवाय समजणार नाही. 

अक्षय चौधरी यांनी 21 मे 2016 ला "भाजपा मुक्ताईनगर" या नावाने व्हाट्सअप ग्रुप सुरू केला होता. या ग्रुपमध्ये भाजपचे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, प्रदेश सरचिटणीस अशोक कांडेलकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन यांच्यासह योगेश कोलते, राजू माळी, विजय चौधरी,पांडुरंग नाफडे आदींचा समावेश आहे. गमतीदार गोष्ट अशी की या ग्रुपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचाही समावेश आहे. ग्रुपवर भाजपच्या घडामोडी शेअर होतात. 

श्री. खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर ॲडमिन श्री चौधरी यांनी आज ग्रुपचे नाव बदलले. त्यात तीन घड्याळे देखील टाकली. ग्रुपमधील अन्य सदस्य नितीन खडसे यांनी ग्रुपच्या नावात पुन्हा बदल करून "एनसीपी मुक्ताईनगर" असे केले. श्री खडसे आणि जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे छायाचित्रही डीपीवर आहे. बदललेल्या परिस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते श्री खडसे यांच्या मागे उभे राहतील असे दिसते. या परिस्थितीत भाजपमध्ये राहणार असलेले नेते, कार्यकर्ते राहतील की जातील याचीच गमतीदार चर्चा सुरू आहे. एखाद्या व्हाट्सअप ग्रुप वर राहिल्याने कार्यकर्त्यांच्या काम आणि निष्ठेत फरक पडत नसला तरी भाजपची पार्टी वीथ डिफरन्स असल्याने काय होते याकडे लक्ष आहे. दरम्यान  ग्रुपचे नाव बदलताच पाच सदस्यांनी ग्रुप सोडला आहे.
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख