भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी काढली राहुल गांधी ची अक्कल! - BJP MP Patil said, Rahul Gandhi has no common sense, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी काढली राहुल गांधी ची अक्कल!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जुलै 2021

भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर शाब्दिक चिखलफेक करण्याचा वाद सुरू असतानाच भाजपचे जळगाव येथील खासदार उन्मेष पाटील यांनी थेट कॉंग्रेस पक्षाचे नेते, खासदार  राहुल गांधी यांची अक्कल काढली आहे.

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर शाब्दिक चिखलफेक करण्याचा वाद सुरू (BJP leaders criticising opposition leader) असतानाच भाजपचे जळगाव येथील खासदार उन्मेष पाटील (BJP Mp Unmesh patil tweet Rahul Gandhi had no common sense) यांनी थेट कॉंग्रेस पक्षाचे नेते, खासदार  राहुल गांधी यांची अक्कल काढली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ट्विटर वरून भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांवर देशातील विविध प्रस्नावरून हल्ला करीत असतात. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना लस उपलब्ध नसल्यामुळे टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी 'व्हेअर आर  वैक्सीन'  या  हॅशटॅग'खाली ट्विट करीत म्हटले आहे की, 'जुलाई आ गया है,  वैक्सीन नही आयी !`

खासदार राहुल गांधी यांच्या ट्विट वर भारतीय जनता पक्षाचे जळगाव येथील खासदार उन्मेष पाटील यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, `वैक्सीन सभी को मिल रही है! मगर आपको अक्कल नही आई`

भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर असभ्य भा।ेत टिका केली होती. त्यावरून वाद सुरूच असताना, भाजप खासदार पाटील यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांवर शाब्दिक चिखलफेक केली आहे. त्यावर काँगेसचे राज्यातील नेते त्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करणार, या कडे लक्ष लागले आहे.
...

हेही वाचा...

तिन्ही कृषी कायदे रद्द व्हावेत ही पक्षाची स्पष्ट भूमिका!
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख