BJP MLAs wel come maratha kranti morcha at house | Sarkarnama

घरी आलेल्या "मराठा' मोर्चाचे भाजपच्या आमदारांकडून स्वागत 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज भाजपच्या शहरातील आमदार राहूल ढिकले, आमदार सिमा हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केले. गंमत म्हणजे पूर्वकल्पना असल्याने या आमदारांनी मोर्चाचे स्वागत केले. मोर्चाला पाठींबा दिला. 

नाशिक : मराठा आरक्षणाचा वरील स्थगिती उठवावी, विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून अध्यादेश काढावा, आरक्षणाच्या मुद्यावर पुर्नयाचिका दाखल करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज भाजपच्या शहरातील आमदार राहूल ढिकले, आमदार सिमा हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केले. गंमत म्हणजे पूर्वकल्पना असल्याने या आमदारांनी मोर्चाचे स्वागत केले. मोर्चाला पाठींबा दिला. 

मराठा क्रांती मोर्चाचा घटक असल्याने आरक्षणाला यापुर्वी देखील पाठिंबा होता. पुढेही राहील असे आश्‍वासन देताना मुख्यमंत्र्यांसह आरक्षण समितीचे अध्यक्ष, राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना पाठींब्याचे पत्र देण्याचे आश्‍वासन यावेळी संबंधीतांनी दिले. जे आमदार, खासदार पत्र देणार नाही त्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा ईशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आमदारांच्या निवासस्थाना समोर पोलिस उपस्थित होते. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शहरातील संघटना आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होते. उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण मान्य केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात देखील उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहील अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध संघटना आक्रमक झाल्या. आंदोलनाचा भाग म्हणून आज आमदारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन दिले. तसेच भाषणे केली. प्रारंभी आमदार ढिकले यांच्या निवास्सथानी आंदोलन झाले. त्यात आमदार ढिकले ढिकले स्वता आंदोलनात सहभागी झाले. करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप, राजू देसले, आशिष हिरे, शरद तुंगार, शिवाजी मोरे, प्रमोद जाधव, माधवी पाटील, निलेश गायखे, किरण पानकर, उज्वला देशमुख आदी उपस्थित होते. 

अन्याय दुर व्हावा 
मराठा आरक्षण स्थगितीच्या निर्णयाला जबाबदार कोण?, कोणी काय केले?, यावर आता चर्चा करायची नाही. परंतू भविष्यातील आरक्षणाची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासुन सुरु असलेल्या या लढ्यात ठराविक लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज उठविला. निवडणुकांपुरता आरक्षणाचा विषय खपवुन घेतला जाणार नाही. पक्षीय विचारसरणी बाजूला ठेवावी आणि मराठा समाजाच्या मदतीची जाणीव ठेवून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण व इतर मागण्यांसंदर्भात विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी योवळी करण्यात आली. 
... 
मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भुमिका यापुर्वी होती व या पुढेही राहील. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या मागणी नुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. पुर्नयाचिका दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- सिमा हिरे, आमदार. 
... 
आम्ही सुध्दा मराठा क्रांती मोर्चाचे घटक आहोत. समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी विधानसभेत आग्रही राहणार आहे. मुख्यमंत्र्यांसह आरक्षण समितीचे अध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे. विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी करणार आहे. - आमदार राहूल ढिकले. 
... 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदन पाठवून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच सक्षमपणे बाजु मांडून मराठा समाजाच्या मागण्याबाबंत तातडीने निर्णय घेऊन त्यांना न्याय मिळावा पाहिजे.- आमदार देवयानी फरांदे. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख