आमदार म्हणाले, हॉस्पिटललाच रेमडेसिव्हिर पुरवठा व्हावा

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून, बाहेरील नागरिक मेडिकलमधून परस्पर इंजेक्शन खरेदी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार सीमा हिरे व ॲड. राहुल ढिकले यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांच्याकडे मागणी केली.
Dhikle- Hire
Dhikle- Hire

नाशिक  : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून, बाहेरील नागरिक मेडिकलमधून परस्पर इंजेक्शन खरेदी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार सीमा हिरे व ॲड. राहुल ढिकले यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांच्याकडे मागणी केली.

कोविडमुळे उद्‌भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने नाशिक शहरात अनेक खासगी कोविड सेंटर आहे. या कोविड सेंटरमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मुळे रुग्णाच्या नातेवाइकांना नाहक त्रास होत आहे. तसेच अनेक मेडिकल स्टोर व हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे जास्त किमतीने विकले जात आहे. इंजेक्शनचा प्राप्त होणारा स्टॉक व वितरण व्यवस्था, यांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच शक्यतो रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा संबंधित कोविड हॉस्पिटलला केल्यास रुग्णाच्या नातेवाइकांना सोयीस्कर होइल. कोविड हॉस्पिटलला शासनाने ठरवून दिलेल्या दरात विक्री करण्याकरिता कडक निर्बध घालावे, नाशि‍क शहरात वाढत्या रुग्णासंख्यवर रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वीस हजार लसींचा डोस स्टॉक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे या वेळी उपस्थित होते.

सायंकाळपर्यंत शहरात साडेचार हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या लस उपलब्ध होतील, अशी माहिती श्रीमती पवार यांनी शिष्टमंडळाला दिली.

शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. रुग्णांना उपचाराच्या योग्य सुविधा उपलब्ध नाहीत.दवाखान्यांत बंड नसल्याने रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. यासंदर्भात शहरातील विविध भागात परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे तातडीने कोरोना उपचाराच्या व औषधांचा पुरवठा याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. नाशिक रोड व शहराच्या अन्य भागात रुग्णांचे नातेवाईक कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी अक्षरशः भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. याविषयी विविध स्तरावर रोज तक्रारी येत आहे, असे आमदार राहूल ढिकले यांनी यावेळी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com