आणखी काही आमदार भाजपला रामराम ठोकणार ! - BJP MLA in our contact says Chhagan Bhujbal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

आणखी काही आमदार भाजपला रामराम ठोकणार !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अजून काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून, ते लवकरच भाजपला रामराम ठोकणार आहेत.

नाशिक : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अजून काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून, ते लवकरच भाजपला रामराम ठोकणार आहेत. आता आम्ही फक्त बॉक्स उघडला आहे. त्यामुळे आमदारांना भाजपने लॉलीपॉप देणे थांबवावे, असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. 

एकनाथ खडसे यांनी भाजपचे बारा ते पंधरा आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर छगन भुजबळ यांनीही स्वतंत्ररीत्या माध्यमांशी संवाद साधताना आम्ही फक्त बॉक्स उघडल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश करण्याकडे अनेकांचा कल होता. आता उलट होत असून, खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने भाजपने आता खडसे यांची काळजी करू नये. सातत्याने अपमान होत असल्याने निराश झालेल्या खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मान होईल. योग्य वेळ आल्यावर पक्षाचे नेते शरद पवार त्यांना न्याय देतील. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर विरोधकांकडून टीका होत आहे. परंतु केंद्र सरकारकडे ‘जीएसटी’चे थकीत व शेतकरी म्हणून आर्थिक मदत मिळाली असती, तर शेतकऱ्यांना अधिक मदत करता आली असती, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 
...

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख