BJP MLA Dr Aher questioned police affects then what about People | Sarkarnama

आमदार राहूल आहेर म्हणाले, पोलिसांनी कोरोनाची लागन होते, तीथे सामान्यांचे काय ?

मोठाभाऊ भामरे
शुक्रवार, 22 मे 2020

जीथे पोलिस व सरकारी अधिकाऱीच बाधीत होतात, तीथे सामान्य नागरीकांचे काय होणार. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आज राज्यभर महाराष्ट्र बचाव आंदोलन केले आहे. जनता भाजप बरोबर आहे, असे आमदार डॅा राहूल आहेर यांनी सांगीतले.
 

नाशिक : महाराष्ट्रात कोरोना रोज हातपाय पसरतो आहे. मात्र राज्य सरकार ढिम्म आहे. जीथे पोलिस व सरकारी अधिकाऱीच बाधीत होतात, तीथे सामान्य नागरीकांचे काय होणार. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आज राज्यभर महाराष्ट्र बचाव आंदोलन केले आहे. जनता भाजप बरोबर आहे, असे आमदार डॅा राहूल आहेर यांनी सांगीतले.

देवळ्यात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. येथील आमदारांच्या निवासस्थानी राज्य सरकारच्या विरोधात  'मेरा आंगण-मेरा रणांगण' निषेध आंदोलन छेडण्यात आले. आमदार डॉ. आहेर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधातील फलक झळकवत व काळ्या फिती लावून  आंदोलन केले. यावेळी आमदार डॉ.आहेर म्हणाले की, सध्या कोरोनाचे संकट असतांनाही या सरकारला त्याचे काही गांभीर्य नाही. राज्यात प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेत ताळमेळ दिसत नाही. रुग्ण रस्त्यात तडफडून मरत आहेत. देशात एकूण कोरोना रुग्णांपैकी तीस टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. तरीही सरकार हातावर हात धरून बसलेल आहे. महिलांवर अत्याचार, साधूंची हत्या होते. यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. पोलिसांना बेसिक पीपीई किट्स उपलब्ध नाहीत. यामुळे राज्यातील पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर काहींना आपले प्राण गमावावे लागले. ही अत्यंत खेदजनक स्थिती आहे. त्यामुळेच राज्यभर आंदोलन होत आहे.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष अतुल पवार,  भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, विजय आहेर, किशोर आहेर, पवन अहिरराव, भाऊसाहेब आहेर, वैजिनाथ देवरे, सागर शिंदे, सोपान सोनवणे, हर्षद भामरे आदी उपस्थित होते. 
 

https://lm.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.sarkarnama.in%2Frajya-...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख