BJP MLA Devyani Pharande says government careless about Bhimnagar Slum | Sarkarnama

आमदार देवयानी फरांदे म्हणतात, "सरकारने भीमवाडी वासीयांना वाऱ्यावर सोडले'

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

शहरातील गंजमाळ भागातील भीमवाडी झोपडपट्टीला एप्रिल महिन्यात आग लागली. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.

नाशिक : शहरातील गंजमाळ भागातील भीमवाडी झोपडपट्टीला एप्रिल महिन्यात आग लागली. त्यात मोठे नुकसान झाले. या नागरीकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वारंवार केली आहे. मात्र सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रतोद, आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी या आपादग्रस्तांसह हातात फलक घेऊन धरणे धरले. 

भिमवाडी झोपडपट्टीत २४ एप्रिलला सिलेंडरच्या स्फोटाने आग लागली. त्यात ११६ झोपड्या खाक झाल्या. या परिवाराचे मोठे नुकसान झाले. महापालिकेच्या वतीने घरे नष्ट झाल्याने या झोपडपट्टीवासीयांना नजीकच्या माहापालिका भालेकर शाळेत निवासाची व्यवस्था केली होती. अद्यापही यातील बहुतांश कुटुंब या शाळेत वास्तव्यास आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या झोपडपट्टीवासीयांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप भरपाई मिळालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर आंदोलन सुरु होते. त्यामुळे आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली भालेकर शाळेत या नागरीकांनी आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. यावेळी आमदार फरांदे यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल दौडे यांना दिले. 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

यावेळी त्या म्हणाल्या, भिमवाडी येथील ११६ परिवारातील सहाशे नागरिकांच्या घरांचे आगीत नुकसान झाले. त्यांच्या झोपड्या पूर्ण जळाल्यामुळे त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये निर्वासितांचे जीवन जगावे लागत आहे. या परिवारांना एक लाख रुपये प्रती परिवार मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची मागणी सरकारकडे आणि जिल्हाधिकाऱ्याकंडे वारंवार करूनही अद्याप निधी देण्यात आलेला नाही. भीमवाडी येथील तीन महिला कलाबाई दगडू साळवे, सरुबाई शशिराव मुंडे व ज्ञानाबाई कढळू हिरोडे यांचा आगीत झालेले नुकसानीने धक्का बसून दुर्दैव मृत्यू झालेला आहे. यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बी. डी. भालेकर शाळेच्या मैदानावर आंदोलन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंन्सिगचे पालन करण्यात आले. नागरीकांनी सॅनिटायझरचा करण्यात आला. यावेळी सचिन गायकवाड, दीपक डोके, महेंद्र सूर्यवंशी, मनिष जयकर, आदींसह भीमवाडी येथील नागरिक उपस्थित होते. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख