भाजपाच्या आमदार देवयानी फरांदेसह आंदोलकांना अटक

महिलांवरील अत्याचार व गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक व पोलिसांत चांगलीच हुज्जत झाली. त्यानंतर रास्ता रोकोचा प्रयत्न करणाऱ्या आमदार देवयानी फरांदेसह आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.
भाजपाच्या आमदार देवयानी फरांदेसह आंदोलकांना अटक

नाशिक : महिलांवरील अत्याचार व गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक व पोलिसांत चांगलीच हुज्जत झाली. त्यानंतर रास्ता रोकोचा प्रयत्न करणाऱ्या आमदार देवयानी फरांदेसह आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. 

भाजपतर्फे शहराच्या विविध भागात आक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार पंचवटी कारंजावर हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी ‘सरकारचा धिक्कार असो’, ‘राज्य सरकार करतय काय? खाली डोकं वरती पाय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. 

यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना कोरोनामुळे सुरु असलेली बंधने, सोशल डिस्टन्स तसेच जमावबंदी लागू करण्यात आल्याची जाणीव करुन दिली. यावेळी काही महिला आक्रमक होऊन रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न करीत असल्याने पोलिसांनी त्याना दूर केले. यावर संतप्त आमदार फरांदे यांनी पोलिसांनी बळाचा वापर करु नये. दडपशाही चालणार नाही. आम्हाला दहा मिनीटे आंदोलन करु द्या, अन्यथा आंदोलन चिघळेल असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर तुम्ही शांततेत आंदोलन करावे. दादागिरी कराल तर कारवाई करावी लागेल, असे स्पष्ट केले. मात्र त्यानंतर देखील भाजपच्या महिला घोषणा देत आंदोलन करीतच असल्याने पोलिसांनी जमावबंदीच्या उल्लंघनाबद्दल आंदोलकांना ताब्यात घेतले. 

महिलांवर होणारे अत्याचार, बालिकांवर होणारे बलात्कार, कोवीड सेंटरमध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी शहराच्या विविध भागात आंदोलन छेडण्यात आले. पंचवटी कारंजावर आज सकाळी भाजपा महिला मोर्चाने आक्रोश आंदोलन केले. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. 

यावेळी आमदार फरांदे म्हणाल्या, राज्यात महिलांवर अत्याचारात वाढ होत आहेत. सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप केला. राज्य सरकारने महिला अत्याचार नियंत्रणात आणावेत. मात्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यांना इशारा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.  

भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आडके, संध्या कुलकर्णी, रोहिणी नायडू, सुनील बागुल, प्रशांत जाधव, सुनील केदार, पवन भगुरकर, जगन पाटील, अमित घुगे आदींसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. 
..
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=NIvK7fgyBKIAX93yjd4&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=9907e1ab94def5beeadc8d2e0e131e81&oe=5FAB9627

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com