BJP Meeting for Ganeshotsav... | Sarkarnama

`भाजप` म्हणते, शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच गणेशोत्सव करा!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

भारतीय जनता पक्षाने शनिवारी शहरातील भाजप प्रणीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिका-यांची वेबेक्स मिटींग घेतली. यावेळी सर्वांनी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व परंपरांचा आदर राखथ गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.

नाशिक : भारतीय जनता पक्षाने शनिवारी शहरातील भाजप प्रणीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिका-यांची वेबेक्स मिटींग घेतली. यावेळी सर्वांनी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व परंपरांचा आदर राखथ गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले. 

गणेशोत्सवानिमित्त भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक , मंडळांचे अध्यक्ष आणि  भारतीय जनता पक्ष प्रणित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची वेबेक्स मिटींग झाली. गणेशोत्सवानिमित्त झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सदस्यांनी सुचना केल्या. यावेळी शहराध्यत्क्ष गिरीश पालवे यांनी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरांचा आदर ठेऊन गणेशोसत्व साजरा करावा, असे सांगितले,

भाजप चे जेष्ठ नेते व मर्चंट बँकेचे अध्यक्ष विजय साने यांनीही कोरोनाच्या पाश्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन सामाजिक नीती मूल्यांचे जतन होईल, अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. गणेशोत्सव साजरा करताना सोशल डीस्टन्सींग व अन्य नियमांचे पालन करावे. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, संभाजी मोरस्कार, प्रथमेश गीते, अजिंक्य साने, अविनाश पाटील, शिवाजी बरके, अमोल इगे आदींनी विविध सूचना केल्या. महापालिका भाजपचे गट नेते जगदीश पाटील यांनी बैठकीतील निर्णयानुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जावा. 

यावेळी पवन भगूरकर, दिगंब धुमाळ, सोमनाथ बोडके, विक्रम नागरे, देवदत्त जीशी, उत्तम उगले, हिमगौरी आडके, पप्पू माने, अनिल भालेराव, डी. एस. खांडेकर, दत्ता शिंदे, योगेश चौधरी, वर्षा भालेराव,  शैलेश कुलकर्णी, रुपाली नेर, राम बडोदे, डी. एस. खांडेकर,  संतोष नेर आदी उपस्थित होते.
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख