BJP leaders, serve corona patients instead of criticizing  | Sarkarnama

  भाजप नेत्यांनो, टीका करण्यापेक्षा कोरोना रूग्णांची सेवा करा...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 मे 2020

भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी टिका न करता आता खऱ्या अर्थाने मैदानात उतरून सेवा करण्याची गरज आहे.

जळगाव : "कोरोना' संसर्गाशी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अत्यंत चांगल्या पध्दतीने लढा देत आहे. परंतु भाजप नेते सहकार्य करण्याऐवजी राजकारण करीत आहे. त्यांनी सरकारवर टीका करण्यापेक्षा आता पीपीई किट घालून "कोरोना'वार्डात सेवा करावी,' असे आवाहन कॉंग्रेसचे केंद्रीय समितीचे सदस्य व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते राज्यसरकारवर टिका करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, ''सत्ताधारी आणि विरोधक यांनी हातात हात घालून काम करण्याची ही वेळ असताना भाजप राजकारण करीत आहे, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली "कोरोना'' संसर्गाविरूध्द अत्यंत चागंल्या पध्दतीने लढा देत आहे. सरकारच्या या कामाला कॉंग्रेसचा पाठिंबा आहे. राज्यसरकार सात लाख नागरिकांना भोजन देत आहे, परराज्यात जाणाऱ्या मजुरांना ट्रेनने जाण्यासाठी पैसे दिले, "कोरोना' रूग्णांसाठी हॉस्पीटल उभारले असे व्यापक स्वरूपाचे काम केले आहे. अगदी तालुका स्तरावरही "कोविड'' सेंटर उभारून त्यात अत्यंत चांगल्या पध्दतीने काम सुरू आहे.

 

सरकारवर उगाच टिका बंद करा  

राज्यात महाविकास आघाडी सरकार "कोरोना'विरूध्द अत्यंत चागंले काम करीत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी तीनही पक्ष सहविचाराने काम करीत आहेत. उलट केंद्रातील भाजप सरकारकडून राज्यातील सरकारला कोणतीही मदत होत नाही. राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्राकडून ही मदत आणण्याची गरज आहे. मात्र, ते उलट राज्य सरकार काम करीत नसल्याबाबत टिका करीत आहेत. भाजपच्या नेत्यांनीही व कार्यकर्त्यांनी टिका न करता आता खऱ्या अर्थाने मैदानात उतरून सेवा करण्याची गरज आहे. त्यानीं आता पीपीई किट घालून कोरोना वार्डात रूग्णांची सेवा करावी. त्यामुळे त्यांना कोरोना वार्डात सरकारकडून रूग्णांना सुविधा दिली जात आहे, कि नाही याची माहितीही होईल आणि त्याच माध्यमातून रूग्णांची सेवाही होईल. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हे आवाहन स्विकारावे, अन्यथा सरकारवर उगाच टिका बंद करावी, असे उल्हास पवार यांनी सांगितले.

 

ही बातमीपण वाचा : 'ती' बातमी चुकीची ; मुंबईची परिस्थिती भयावह...  

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार ज्या उपाययोजना करीत आहेत, त्या पुरेशा नाही. कोरानाबाबतचे सरकारचे काम कैातुकास्पद नसल्याचे निती आयोगाने म्हटले आहे. कोराना संकटाविरूद्ध लढण्यासाठी राज्य सरकारचे काम उल्लेखनीय असून त्यांचे निती आयोगाने कैातुक केल्याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते. निती आयोगाने आपल्या ट्विटरद्वारे याबाबत खुलासा केला आहे. राज्य सरकारचे मुंबई मॅाडेल देशभरात वापरले जाणार असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होतो, मात्र, हा दावा चुकीचा असल्याचे निती आयोगाने म्हटले आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकार मात्र दिशाभूल करीत आहेत, असे निती आयोगाने स्पष्ट केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख