रस्त्यात वाढदिवस करणे भाजप नेत्याला भोवणार? - Bjp leader will be in Problem on birthday celebration on Road | Politics Marathi News - Sarkarnama

रस्त्यात वाढदिवस करणे भाजप नेत्याला भोवणार?

प्रमोद दंडगव्हाळ
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

पोलीस आयुक्तांच्या आदेशाला तिलांजली देत, कोरोनाचे नियम गुंडाळून ठेवत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने भररस्त्यात आपला वाढदिवस साजरा केला. त्याला शहरातील पदाधिका-यांनीही हजेरी लावली. मात्र आता हे प्रकरण थेट महासंचालकांपर्यंत गेल्याने वाढदिवसाच्या आनंदावर चांगलेच विरजन पडण्याची चिन्हे आहेत. 

सिडको : पोलीस आयुक्तांच्या आदेशाला तिलांजली देत, कोरोनाचे नियम गुंडाळून ठेवत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने भररस्त्यात आपला वाढदिवस साजरा केला. त्याला शहरातील पदाधिका-यांनीही हजेरी लावली. मात्र आता हे प्रकरण थेट महासंचालकांपर्यंत गेल्याने वाढदिवसाच्या आनंदावर चांगलेच विरजन पडण्याची चिन्हे आहेत. 

कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास, विना मास्क वावरण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. मात्र हे नियम पाळतील तर ते राजकीय नेते कसले? त्याला कोणताच राजकीय पक्ष, नेता अपवाद नसतो. असाच एक प्रकार बुधवारी सिडको परिसरात अगदी वर्दळीच्या चौकातच झाल्याने त्याची चांगलीच चर्चा आहे. 

शासकीय नियम धाब्यावर बसवत प्रदेश व शहर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपच्या एका महिला शहर पदाधिका-याच्या "पती देवां" च्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. त्याविषयी नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र याची बातमी प्रसिद्ध होताच आज विशेष पोलिस महानिरीक्षकांनी त्याची दखल घेतली. त्याबाबत अंबड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना या बातमीची दखल घेण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे हे प्रकरण आता भाजपच्या या नेत्याचा वाढदिवसाचा आनंद काही क्षणात गांभिर्यात बदलला आहे.  यावर काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

कोरोनाचे संकट अजूनही संपलेला नाही. प्रत्येकाने आपल्याबरोबर दुसऱ्याची काळजी घ्यावी. कोरोना पासून दोन हात दूर राहावे असा संदेश वारंवार मुख्यमंत्री, शासन-प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन देत आहे. अगदी बेंबीच्या देठापासून प्रत्येकाला हात जोडून कळकळीची विनंती करण्यात येत आहे. याकरिता आरोग्य विभाग वारंवार सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगत आहे. आजही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. शासन - प्रशासन पोटतिडकीने सांगत असताना बोटावर मोजण्याइतके काही लोकप्रतिनिधी मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे यानिमित्ताने दिसले. 
....

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख