माफी मागितली नाही, तर प्रवीण दरेकरांना राष्ट्रवादी काळे फासणार

प्रवीण दरेकर यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले.
 माफी मागितली नाही, तर प्रवीण दरेकरांना राष्ट्रवादी काळे फासणार
Sarkarnama - 2021-09-15T154429.890.jpg

जळगाव : राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या प्रतिमेला जोडे मारून राष्ट्रवादी जिल्हा महिला आघाडीने आज निषेध केला. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा  महिलांचा मुका घेणारा पक्ष असल्याचे विधान केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीतर्फे (Jalgaon NCP) त्यांचा निषेध केला आहे.

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन केले आहे. प्रवीण दरेकर यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले.  यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील म्हणाल्या,  ''प्रवीण दरेकर यांनी महिलांचा अपमान केला आहे, त्यांनी त्वरित माफी मागितली नाही तर ते दिसतील तेथे महिला आघाडी त्यांच्या तोंडाला काळे फासतील.''

IPS वैभव निंबाळकर यांची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केल्यानतंर, प्रवीण दरेकर यांनी दोन दिवसांपुर्वी एका जाहीर सभेत त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. 'राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे', असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावर रुपाली चाकणकरांनी त्याना महिलांची माफी मागण्याचा इशाराही दिला. मात्र तरीही दरेकरांनी यावर स्पष्टीकरण देताना, ''माझे वक्तव्य नीट ऐकले तर त्याचा अर्थ कळेल पण हे दुसरं काही नाही तर वड्याचं तेल वांग्यावर काढायचा प्रकार आहे, कारण अशा वक्तव्यांमुळे त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते,'' असे म्हणत माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले.  या घडामोडीनंतर पुन्हा एकदा आता भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमने-सामने आले आहेत.
 
दोन दिवसांपुर्वी पुण्यात आयोजित रामोशी समाजाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. "राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.'' असे दरेकर म्हणाले होते.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in