बहुजनांचा मुख्यमंत्री व्हावा, म्हटल्यानेच चौकशीचा ससेमीरा लागला ! - Bjp leader Eknath Khadse PC In Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

बहुजनांचा मुख्यमंत्री व्हावा, म्हटल्यानेच चौकशीचा ससेमीरा लागला !

संपत देवगिरे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

भाजप हा शेठजी, भटजींचा पक्ष अशी ओळख असतानापासून आम्ही काम करीत आलो. या पक्षाला बहुजनांचा चेहरा दिला. मात्र जेव्हा बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली, तेव्हा माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा सुरु केला.

नाशिक : भाजप हा शेठजी, भटजींचा पक्ष अशी ओळख असतानापासून आम्ही काम करीत आलो. या पक्षाला बहुजनांचा चेहरा दिला. मात्र जेव्हा बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली, तेव्हा माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा सुरु केला, असे राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षात प्रवेश केलेले पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनात खढसे यांनी सांगितले. 

श्री. खडसे आज मुंबईहून मुक्ताईनगरला जात होते. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. यावेळी ते काही वेळ नाशिकला थांबले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना, ते म्हणाले, गेली चार वर्षे मी भितीच्या छायेत वावरत होते. माझ्यामागे लाचलुचपत विभाग, इडी, पोलिस, विनंयभंग असे कितीतरी चौकशींची प्रकरणे सुरु केली होती. या स्रव प्रकरणांतून मी आता मुक्त झालो आहे. त्यामुळे माझे टेन्शन संपले आहे. आता ज्यांनी मला त्रास दिला त्यांना टेन्शन देण्याचे काम करणार आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंवि,यी केलेल्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मी वारंवार विधानसभेत माझ्यावर काय आरोप आहेत. कोणती प्रकरणे आहेत. मी बदमाश, चोर की कोण आहे ते एकदाचे सांगा अशी मागणी करीत होतो. मात्र फडणवीस तेव्हा एक शब्दही बोलले नाहीत. जे सांगायचे ते विधानसभेत सांगायचे असते. त्याला महत्व असते. आता बाहेर बोलण्याला काय अर्थ आहे, असे खडसे म्हणाले.

ईडी, सीडी, बीडी हे प्रतिके

यावेळी श्री. खडसे म्हणाले, ईडी, सीडी, बीडी ही सगळी भाषणातील प्रतिके आहेत. त्यांची फार चर्चा करु नका. मी जेव्हा भाजप शेठजी, भडजींचा पक्ष अशी ओळख होती, तेव्हा भाजपचे काम सुरु केले. गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे, आण्णा डांगे, सुर्यभान वहाडणे अशा आम्ही सगळ्यांनी या पक्षाला बहुजनांचा चेहरा दिला. खुप परिश्रम घेतले. मात्र जेव्हा सत्ता आली तेव्हा बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा अशी फक्त अपेक्षा व्यक्त केली होती. तेव्हढ्याने माझ्या विरोधात केव्हढ्या चौकशा लावल्या. भाजपमध्ये बहुजन नेते, कार्यकर्ते यांना भविष्य नाही, अशी अनेकांची भावना आहे. तेव्हा अनेक मंडळी पक्षांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. आमदार, खासदार व जे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत, त्यांचे प्रवेश पक्षांतर बंदी कायद्याचा विचार करुन होईल. इतर सगळ्यांचे प्रवेश होतील. कदाचीत आता रोजच राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाचे कार्यक्रम होतील.

कार्यकर्ता म्हणून अधिक आनंदी
मला मंत्रीपदाचे आश्वासन दिले की काय आश्वासन दिले, यावर फार चर्चा करु नका. मला उत्तर महाराष्ट्रातील विकासकामे, रखडलेले प्रकल्प यांना गती द्यायची आहे. त्यासाठी निधी मिळावा, कामांना गती दिली जावी एव्हढीच अपेक्षा आहे. साधा कार्यकर्ता म्हणून काम करणे मला अधिक आवडेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा रोहिनी खडसे यांसह विविध पदाधिकारी होते.
...
  
 

https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख