BJP Leader Atul Bhatkhalkar critocise state Government | Sarkarnama

हेलिकॉप्टरच्या बाता अन्‌ निवृत्तिनाथांची पालखी लाल डब्यातून

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

हे सरकार हेलिकॉप्टरच्या बाता मारते मात्र संत निवृत्तिनाथांची पालखी काल एसटी बसने पंढरपूरला पाठवली. त्याचेदेखील बिल आकारले. हे सरकार निर्लज्ज आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अतुल भातखळखर यांनी व्यक्त केली. 
 

नाशिक :  हे सरकार हेलिकॉप्टरच्या बाता मारते मात्र संत निवृत्तिनाथांची पालखी काल एसटी बसने पंढरपूरला पाठवली. त्याचेदेखील बिल आकारले. हे सरकार निर्लज्ज आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अतुल भातखळखर यांनी व्यक्त केली. 

या संदर्भात त्यांनी आज ट्विट करून राज्य शासनावर अतिशय कठोर शब्दांत टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रिट्‌विट केलेल्या आपल्या ट्‌विटमध्ये ते म्हणतात, "हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तिनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही 71 हजार रुपयांचे बिल फाडले... निर्लज्ज सरकार.' 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा आषाढी एकादशीला राज्यातून निघणाऱ्या दिंड्या व पालख्या रद्द करण्यात आल्या. याविषयी सुरवातीपासूनच विरोधी पक्षांकडून, विशेषतः भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेचा सूर आळवला होता. त्यांनी याबाबत पालखीप्रमुखांची बैठक घेऊन चर्चाही केली होती. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग व पायी दिंडीच्या मार्गावरील गावे, सहभागी होणारे वारकरी, त्यांची संख्या याचा विचार करता वारी रद्द करण्याचा मतप्रवाह होता. वारकऱ्यांनी दिंडी न काढण्याचे जाहीर केले होते. यावरून सत्ताधारी व विरोधकांत राजकारण तापले होते. आता पालख्या शिवशाही बसने गेल्यावर त्यावर पुन्हा भाजप नेत्यांची अतिशय कठोर शब्दांत टीका झाल्याने, हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. 

भाजप नेत्यांच्या या ट्विटला सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून अद्याप कोणीही उत्तर दिलेले नाही. विशेषतः यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याची उत्सुकता आहे. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख